महाबळेश्वर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधम शिक्षकाला अटक

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाइन –  महाबळेश्वर येथील एका नराधम शिक्षकाने शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, नराधम शिक्षक दिपक ढेबे याला कोर्टाने सात दिवसाची पोलीस ठोठावली आहे.आरोपी दिपक ढेबे याच्यावर महाबळेश्वर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिलीप ढेबे हे महाबळेश्वर मधील एका हायस्कुलचे मुख्याद्यापक आहेत. शाळेतील एका शाळकरी विद्यार्थींनीवर शाळेच्या प्रयोग शाळेतच लैंगिक अत्याचार केल्याचे पुढे आले. आरोपी ढेबे याच्यावर भादंवि 354 (अ), 376 क,नुसार अनेक गुन्हे दाखल केले आहे. तर त्याने यापूर्वी असे काही कृत्य केले आहे का याचाही तपास केला जात आहे. अशी माहिती साताऱ्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली आहे.

दरम्यान, ८ मार्चला चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८ या क्रमांकावर संपर्क साधून एका विद्यार्थीनीने महाबळेश्वरा मधील माकरीया शाळेतील मुख्याद्यापक एका शाळकरी मुलीवर अत्याचार करत असल्याची माहिती दिली होती. यावरून पोलिसांनी पिडीत मुलीचा तपास घेतला. तीची फिर्याद घेऊन शाळेतील मुख्याद्यापक दिपक ढेबेला ताब्यात घेतले. सातारा एसपी बन्सल यांनी विविध शाळेत चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकाबाबत माहिती दिली होती. यामुळे सर्व घटना समोर आली आहे.