प्रयागराजमध्ये सापडला महाभारताच्या काळातील बोगदा, ‘पांडव’ येथूनच बाहेर पडल्याचा ‘दावा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाभारत म्हणजे भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा आरसा मानले जाते. आजही प्रत्येक भारतीयाला महाभारताच्या कथेबद्दल कमालीची उत्सुकता असते आणि लोक त्याबद्दल जाणून घेण्यास नेहमीच उत्सुक असतात. याच कारणामुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र प्रयागराजमधील महाभारत काळातील लाक्षागृह वन पुन्हा चर्चेत आले आहे.

प्रयागराज में मिली महाभारत काल की सुरंग, क्या पांडव यहीं से निकले थे?

काही दिवसांपूर्वी तेथील खोदकामातील अवशेषांमध्ये दगडांचा बोगदा दिसला जो लोकांच्या उत्सुकतेचे केंद्र बनला आहे. हा बोगदा सुमारे चार फूट रुंद आहे, परंतु बोगद्याचा फक्त एकच भाग दिसत आहे, कारण उर्वरित बोगदा अद्याप मातीच्या ढिगाऱ्यात बुजलेला आहे.

प्रयागराज में मिली महाभारत काल की सुरंग, क्या पांडव यहीं से निकले थे?

काय आहे लाक्षागृह :

महाभारत कथेनुसार, महाभारत काळात पांडवांना जिवंत जाळण्यासाठी दुर्योधनने गंगा नदीच्या काठावर लाखांचा वाडा तयार केला होता. मात्र पांडवांचा हितचिंतक असलेल्या विदुराने पांडवांना दुर्योधनाच्या या कटाविषयी माहिती दिली. ही माहिती मिळताच पांडव बोगदा बनवून गुपचूप आणि सुरक्षितपणे बाहेर आले आणि स्वतःचे प्राण वाचवले. बोगद्याबद्दल, लोक असा दावा करीत आहेत की हाच तो बोगदा आहे ज्याद्वारे द्वापार युगात पांडवांनी लाखाच्या वाड्यातून सुरक्षित बाहेर पडून आपले प्राण वाचवले. बोगदा मिळाल्यानंतर प्रयागराजच्या या अवशेषांना पुन्हा महाभारत युगातील लाक्षागृह म्हणून घोषित करण्याची मागणी सुरू झाली. हा बोगदा आणि अवशेषांना महाभारत काळाची लाक्षागृह म्हणून जाहीर करण्याबरोबरच पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी लोकांनी आवाज उठविला आहे.

प्रयागराज में मिली महाभारत काल की सुरंग, क्या पांडव यहीं से निकले थे?

महाभारतात या घटनेचे सविस्तर वर्णन आहे, परंतु लाक्षागृह कुठे होते, याचा स्पष्ट उल्लेख नाही. देशात अशी चार-पाच ठिकाणे आहेत, ज्यांचा महाभारत काळातील लाक्षागृह असा दावा केला जातो. प्रयागराज शहरातील संगमपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर हंडिया भागातील गंगा नदीच्या काठावरही अवशेष आहेत, जे महाभारत काळाचे लाक्षागृह असल्याचा दावा केला जातो.

प्रयागराज में मिली महाभारत काल की सुरंग, क्या पांडव यहीं से निकले थे?