…म्हणून बसपा-सपा यांच्यात ‘काडीमोड’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सपा, बसपा आणि राष्ट्रीय लोकदलने लोकसभा निवडणूकीवेळी केलेले गठबंधन उत्तर प्रदेशात सपशेल फेल गेल्याचे चित्र आहे. जर मतदानाची टक्केवारी पाहिली तर गठबंधनमधील पक्षाची मते एक-दुसऱ्यांना गेल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतू भाजपला मिळालेली मतदानाची टक्केवारी त्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत एकमेकांना गेलेल्या मतांमुळे सपा बसपाचा गठबंधन करण्याचा उद्देश कुचकामी ठरला आणि त्याचा फायदा भाजपला जागा वाढण्यात झाला.

आता बसपा – सपा वेगवेगळी निवडणूक लढणार असून स्वबळावर भाजपला ठक्कर देण्याच्या तयारीत आहे. मायावतींनी सपावर यादव मतांना साद घालू न शकल्याचा आरोप केला आहे आणि सपाच्या अखिलेश यादव यांच्या बरोबरचे गठबंधन तोडले आहे.

सपा-बसपाच्या गठबंधनात असे मतदार होते जे कधी सपाला मतदान करत होते तर कधी बसपाला. हे असे मतदार होते की त्यांनी उत्तर प्रदेशात कधी सपाला सत्ता मिळवून दिली तर कधी बसपाला. परंतू आता या तरंगत्या मतदारांनी मतदान भाजपला दिले. तर गठबंधनात असल्याने अनेक मते एकमेकांत विस्तृत झाली. त्याचाच फायदा भाजपला झाला आणि सपा – बसपाच्या मतदार टक्केवारी पेक्षा जास्त टक्केवारी भाजपला गेली.

2019 च्या या लोकसभा निवडणूकीत भाजपने उत्तर प्रदेशातून तब्बल 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवली आहेत. तर गठबंधनात असून देखील सपा बसपाला एवढी मते मिळवता आली नाही. तसेच यात हे ही तथ्य आहे की भाजपला मिळालेली मते तीच मते आहेत जी पुर्वी सपा-बसपाला मिळत होती. मत फुटत आहे हे लक्षात आल्याने आता सपा-बसपाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.