काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर होणार महाकाल मंदिराचा विकास, मध्यप्रदेश सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, जाणून घ्या

उज्जैन : पोलीसनामा ऑनलाईन – काशी विश्व नाथ मंदिराच्या धर्तीवर होणार महाकालेश्वर मंदिराचा विकास मध्य प्रदेश सरकारने उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराच्या विकासासाठी उत्तरप्रदेश मधील काशी विश्व् नाथ मंदिरासाठी राबवल्या गेलेल्या विकास आराखड्यास आदर्श मानले आहे. येथील महाकाल मंदिराचा परिसर याच धर्तीवर विकसित केला जाणार आहेत. यासाठी मंदिराच्या परिसरातील जागा आणि घरे सुद्धा अधिग्रहित करण्यात आली आहेत. अधिग्रहित करण्यात आलेल्या घरांच्या व जमिनीच्या भरपाईबाबत शासन लवकरच निर्णय घेईल. तर यासंदर्भातील नवीन अधिनियमांचा मसुदा पंधरा दिवसात सादर करण्यात येईल.

मंदिर विकासाचा आराखडा विधानसभेच्या पुढील अधिवेशनात पारित करुन अंमलात आणला जाईल. असे शुक्रवारी बृहस्पति भवन येथे पार पडलेल्या तीन मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांद्वारे गठीत बैठकीत सज्जनसिंह वर्मा, जयवर्धन सिंह आणि पी. सी शर्मा यांचा समावेश आहे.

प्रमुख नेत्यांच्या सूचनांचाही विचार केला जाणार
प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यासंदर्भात लोकप्रतिनिधी व मंदिर समिती सदस्यां व्यतिरिक्त प्रमुख नेत्यांच्या सूचनांचाही विचार केला जाणार आहे. या बैठकी नंतर मंत्री सज्जनसिंह वर्मा यांनी सांगितलं कि, मंदिर समिती आणि राज्य सरकार यांच्या सहयोगाने ३०० करोड रुपयांचा प्लान लागू केला जात आहे.

गरज पडल्यास एक हजार करोड रुपयांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य सरकार तयार असेल. खाजगी क्षेत्रातील दानशूरांची हि मदत घेतली जाईल. अशा दानशूरांसोबत संपर्कही केला जात आहे. वर्मांनी सांगितले कि, महाकाल मंदिराच्या निर्माणासाठी मंदिराचा पॅटर्न लागू केला जाणार आहे. यासाठी एक टीम काशीला जाऊन प्लॅन आणि लागू केल्या गेलेल्या कायदे – कानून यांची सविस्तर माहिती घेईल. याप्रमाणेच शिर्डी , सोमनाथ आणि तिरुपती बालाजी येथील मंदिरांचा अभ्यास केला जाणार आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यात व्हीआयपी दर्शन केवळ दोन तासच
महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यात व्हीआयपी आणि अभिषेक इत्यादी पूजेसाठी आता वेळ निश्चित केली जाईल. सकाळी भस्म आरती नंतर ६ ते ७ आणि दुपारी ३ ते ४ पर्यंत मंदिराच्या गाभाऱ्यात व्हीआयपी, आणि अभिषेक पूजेसाठी प्रवेश दिला जाईल. हा आदेश शुक्रवारी दुपारी ३ वाजेपासूनच लागू केला जाईल. जसं कि, मुख्य सण शिवरात्रि, नागपंचमी, शाही सवारी या वेळेस व्हीआयपी दर्शनाची व्यवथा पूर्णपणे बंद राहील.

जाणून घ्या, काशीमध्ये होत असलेला विकास
– काशी विश्वनाथ विशेष क्षेत्र विकास मंडळ तयार केले, ज्यात सर्व विभागांचा समावेश आहे.
-क्षेत्रावर आधारित विकासासाठी १६५० कोटींची तरतूद.
-१३८० एकर जागेवर आखली गेली आहे विकासाची योजना
-दशाश्वमेध घाट आणि टोला या दोन वॉर्डांनी 296 घरे ताब्यात घेतली आणि मंदिरेही हलविली
-दोन वार्ड, दशाश्वमेध घाट आणि टोला येथील २९६ घरे अधिग्रहीत करून.
-एक मंदिर सुद्धा हलवले गेले.

महाकाल साठी आत्तापर्यंतचा आराखडा
-प्राधिकरण निर्माण करण्याऐवजी मंदिर व्यवस्थापन समिती कायद्यात दुरुस्ती केली जाईल.
-विकासासाठी स्मार्ट सिटी कंपनी व महाकाल मंदिर समितीची योजना.
-स्मार्ट सिटीद्वारे ३०० कोटींची तरतूद, केंद्र सरकार व मंदिर समितीचे विशेष सहकार्य.
-बहुस्तरीय पार्किंगसाठी भूसंपादनाची कारवाई.

‘ही’ जमीन महाकाळच्या विकासासाठी अधिग्रहित केली जाईल
-अधिग्रहण प्रक्रिया सुरू असून, त्रिवेणी संग्रहालयासमोर जयसिंगपूरमधील ४ हेक्टर जागेवर मल्टी लेव्हल पार्किंग असेल.
-महाकाल मंदिरासमोर 11 घरे.
-माधव सेवा ट्रस्ट पार्किंग व महाकालेश्वर भक्त निवास.

‘ही’ जमीन विकास कामांसाठी उपलब्ध आहे.
-महाराजवाडा भवन व संकुल.
-रुद्रसागर जवळ स्वामी विश्वात्मानंद अन्नक्षेत्र.
-रुद्रसागर च्या बाजूने महानगरपालिकेची जागा.
-येथून अतिक्रमणे हटविली जातील
-मठा पासून रुद्रसागर च्या दिशेने असलेले माधव सेवा ट्रस्टचे पार्किंग.
-महाराजवाड्यात महाकाल मंदिर संकुल आणि खासगी घरे.
(जमीन आणि घरांचा सर्वे केला गेला आहे)

सोमनाथमध्ये बाहेरूनच दर्शन तर शिर्डी मध्ये दर्शनासाठी आहे तिकीट
शिर्डी :

महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील साई मंदिरात दर्शनासाठी काउंटरवरून आयडी पाहिल्यानंतर तिकिट दिले जाते. दर्शनाची वेळ व गेट क्रमांक तिकिटावर नमूद केलेला असतो. तिकिट काउंटरजवळ एक क्लॉक रूम, शू स्टँड देखील आहे.प्रवाशांना दिलेल्या वेळेवर निश्चित केलेल्या गेट क्रमांकावरून दर्शनासाठ प्रवेश करतात.

सोमनाथ:
गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यास अनुमती नाही. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रांगेसाठी बॅरिकेड्स लावले आहेत. या भागात क्लॉक रूम, प्रसाद काउंटर, मोबाइल कियोस्क, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा आहेत. रात्री लेजर शो च्या माध्यमातून मंदिराचा इतिहास दर्शविला जातो.

आरोग्यविषयक वृत्त