सारसबाग नवरात्रोत्सवातर्फे महालक्ष्मी सोन्याच्या साडीने आभूषित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरातील श्री महालक्ष्मी देवीस आज बुधवार दुपारी ४  वाजता सोन्याची साडी परिधान करण्यात आली. देवीला सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचे  हे ८ वे वर्ष आहे. दरवर्षी विजयादशमी निमित्त श्री महालक्ष्मी देवीस सोन्याची साडी परिधान करण्याची श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग नवरात्रोत्सवातर्फे परंपरा आहे.
 [amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0aa851a4-d211-11e8-a2b3-b55fea319a6e’]
अंदाजे १३ किलो वजनाची ही  साडी संपूर्ण शुध्द सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. कुंभकोणम येथील कारागिरांनी तब्ब्ल १ वर्षे मेहनत करून ही साडी तयार केली आहे. या कारागिरांनी पुण्यात मंदिरात १ वर्षे मुक्काम करून अहोरात्र कष्ट करून ही  साडी तयार केली. ही सोन्याची साडी खास विजयादशमीच्या दिवशी देवीला परिधान केली जाते. सुवर्ण वस्त्राने परिधान देवीचे हे आगळे वेगळे रूप भाविकांना उद्या विजयादशमीच्या दिवशी रात्रीपर्यंत अनुभवता येणार आहे. याबाबतची माहिती  महालक्ष्मी मंदिराचे संस्थापक मुख्य विश्वस्त राजकुमार अग्रवाल यांनी दिली.
[amazon_link asins=’B00VT8CUHS,B00PQKR85E’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’18986f30-d211-11e8-b998-d3d3349bcb3a’]