Coronavirus : महाराष्ट्रात 6 दिवसाच्या मुलाला झाला ‘कोरोना’, वडिलांनी PM मोदींकडे मदत मागितली

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात बुधवारी कोरोनाची ३३ प्रकरणे समोर आली असून त्यात सहा दिवसाचे एक बाळही आहे. त्याच्या २६ वर्षीय आई आणि नर्सलाही कोरोनाची लागण झाली आहे. यासह राज्यात या व्हायरसने संक्रमितांची संख्या ३३५ झाली असून मृतांचा आकडा १६ झाला आहे.

बाळाचे वडील वी. सिंह यांनी सांगितले की, बाळ २६ मार्चला रात्री चेंबूरमध्ये एका रुग्णालयात जन्मले, जिथे एक कोरोना पॉजिटीव्ह मिळाला. ते म्हणाले, “आम्हाला तात्काळ रुग्णालय सोडायला सांगितले आहे, ज्याला क्वारंटाइन केले जात आहे आणि डॉक्टरांनी आमच्या देखरेखीला नकार दिला आहे. माझी बायको आणि मुलांचा रिपोर्ट जवळजवळ मध्यरात्री पॉजिटीव्ह आला. तेव्हापासून आम्ही कस्तुरबा रुग्णालयात आहोत.”

त्यांनी सरकार, पीएम नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विनंती केली की, त्यांची मुले आणि बायकोचे उपचार केले जावे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात कोविड-१९ मुळे बुधवारी ५ मृत्यू झाले असून आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढून १६ झाला आहे.

मृतांमध्ये मुंबईचे दोन पुरुष आहेत ज्यांचे वय ५१ आणि ७५ वर्ष होते. दोघांचा कोणताही विदेश प्रवास केल्याचे आढळत नाहीत. यादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या एका सहकाऱ्याने म्हटले की, पंतप्रधान मोदींनी ठाकरेंसोबत फोनवर संवाद साधला आहे. तसेच त्यांनी राज्यातील कोरोना स्थितीवर चर्चा केली.