आर.आर. पाटलांच्या पत्नी सुमन पाटील यांच्याविरूध्द ‘या’ केंद्रीय मंत्र्यांची पत्नी निवडणूक लढवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले आता विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ते ही निवडणूक तासगाव – कवठे महांकाळमधूून लढणार आहेत. यावर बोलताना सीमा आठवले म्हणाल्या की, तासगावच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्लीहून निधी आणू आणि विकास करु, तासगावमध्ये आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.

पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्या म्हणाल्या की, दुष्काळी भागातील शेतकरी, शेतमजूर आणि शेतीला लागणाऱ्या पाण्यासंबंधित समस्या येणाऱ्या काळात पूर्णत्वास नेणे हे आपले लक्ष असेल. याशिवाय महिलांच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचवण्यासाठी रपब्लिकन महिला आघाडीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.  

सीमा आठवले लढणार असलेल्या बालेकिल्ला राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या समजला जातो. येथून आबांच्या पत्नी सुमन पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित  मानली जात आहे. 

याशिवाय सांगलीतील भाजप नेते संजयकाका पाटील यांना 2014 मध्ये खासदारकी मिळाली. आता संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील यांना तासगाव – कवठे महांकाळ मतदार संघातून तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे ज्योती पाटील विरुद्ध सुमन पाटील यांची अटीतटीची लढत मानली जात होती परंतू आता सीमा आठवले यांनी देखील निवणडूक लढण्याची तयारी दर्शवल्याने आता तिकिट नक्की कोणाला मिळणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

Loading...
You might also like