वाकड, भूमकर चौक, सांगवी, कलाटेनगर परिसरात राहूल कलाटेंच्या रॅलीला उदंड प्रतिसाद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवार राहूल कलाटे यांनी आज वाकडसह चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाकडसह विविध परिसरात रॅली काढून नागरिकांशी संवाद साधला. रॅलीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी महिला भगिनींनी कलाटे यांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

या रॅलीमध्ये सवपक्षीय नेते, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीला वाकड येथून सुरुवात झाली. भूमकरवस्ती, भूमकरचौकर, विनोदेनगर, धर्मवीर संभाजी महाराज चौक, जाधव कॉर्नर, काळाखडक, स्वामी विवेकानंद नगर, सम्राट चौक वाकड, कलाटेनगर, मनोहर पार्क, पिंक सिटी, वेणूनगर, साई चौक, शेंडगे पार्क, सानोबा चौक वाकड, पलश हौसिंग सोसायटी, साईनाथ कॉलनी, राधाकृष्ण कॉलनी, दत्त मंदिर रोड, माऊली चौक वाकड, माता रमाबाई आंबेडकर चौक, गीता सोसायटी, भाऊसाहेब कलाटे नगर, शेख चौक, निसर्गदिप कॉलनी, जय भवानीनगर शेंडगे वस्ती, दक्षता नगर, मानकरवस्ती, साई मंदि हिंद चौक, इंगवले चौक तसेच संस्कृती सोसायटी परिसरातून रॅली काढण्यात आली.

रॅलीचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे मिळणारा प्रतिसाद यामुळे रॅलीमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. माता भगीनींनी यावेळी औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान कलाटे यांनी नागरिकांशी संवाद साधत चिंचवडच्या विकासाचे अभिवचन दिले.

चिंचवड विधानसभेतील 35 चर्च प्रमुखांचा कलाटेंना पाठिंबा
चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 35 चर्च प्रमुखांनी पाठिंबा दिला. सर्वधर्मियांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे कलाटे यांचे पारडे जड झाले आहे. चिंचवड विधानसभेतील सर्वपक्षीय उमेदवार राहूल कलाटे यांना यापूर्वीच वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, नागरी सुरक्षा समिती, मुस्लिम समाजातील विविध संघटना, विविध पक्ष, मतदारसंघातील संस्थांनी पाठिंबा दिला आहे. आता मतदारसंघातील सर्वच्या सर्व चर्च प्रमुखांनी कलाटे यांना पाठींबा दिल्यामुळे कलाटे यांचे पारडे जड झाले आहे.

सामाजिक संघटनांकडूनही अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे यांना पाठिंब्याचा ओघ सुरु आहे. काल पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला होता. मुस्लिम समाजाबरोबर बहुजन समाजात पानसरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे कलाटे यांची ताकद वाढली असतानाच चिंचवड विधानसभा मतदार संघातील 35 चर्च प्रमुखांनी एकत्रित बैठक घेत कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला. सर्वधर्मियांना सामावून घेत बहुजन समाजाच्या विकासासाठी जनतेचे उमेदवार म्हणून राहुल कलाटे यांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केरळी आणि बदवानी समाजाचा पाठिंबा
चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात रहिवाशी असलेल्या केरळी आणि बदवानी समाजाने आज (गुरुवारी) राहूल कलाटे यांना विनाशर्त पाठिंबा दिला. तरुणाच्या हाती नेतृत्त्व, विकासाचा दृष्टीकोन आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी राहूल कलाटे यांना पाठिंबा देत असल्याचे केरळी आणि बदवानी समाजाने जाहिर केले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी