संभाजी ब्रिगेडकडून विधानसभेसाठी 15 मतदारसंघातून ‘या’ 15 जणांची उमेदवारी जाहिर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू असतानाच संभाजी ब्रिगेडने आपल्या १५ उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. संभाजी ब्रिगेडने उमेदवारांची पहिली यादी जाहिर केल्याने आगामी विधानसभा निवडणूक रंगदार होणार हे निश्चीत झाले आहे.

संभाजी ब्रिगेडच्या संसदीय समितीची गुरुवारी (दि.२२) प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे आणि महासचिव सौरभ खेडेकर यांच्या उपस्थित पुण्यातील कार्य़ालयात बैठक झाली. त्यामध्ये संभाजी ब्रिगेडने विधानसभेसाठी उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब केले असल्याचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानूसे यांनी सांगितले. भानूसे यांनी याची माहिती औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

स्वत:साठी लढणार

इतके दिवस दुसऱ्यांसाठी लढलो आता स्वत:साठी निवडणूक लढवणार आहे. मागील 25 वर्षे दुसऱ्यासाठी लढलो आहे आता स्वत:साठी लढून जिंकण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी राज्यभर संपर्कप्रमुख मुलाखती घेत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे.

‘शिलाई’ मशीन चिन्हावर लढणार

संभाजी ब्रिगेडने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून निवडणूक आयोगाकडून शिलाई मशिन अधिकृत चिन्ह मिळाले आहे. आमचा राजकीय अजेंडा ठरलेला आहे. जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याची भूमीका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे.

उमेदवारांची पहिली यादी

1. कारंजा (वाशिम) माणिकराव महादेव पावडे
2. आर्वी (वर्धा) अशिष नरसिंगराव खंडागळे
3. देवळी (वर्धा) राजू ऊर्फ नितीन पुंडलिकराव वानखेडे
4. गडचिरोली (गडचिरोली) दिलीप किसनराव मडावी
5. ब्रह्मपुरी (चंद्रपूर) जगदीश नंदूजी पिलारे
6. वरोरा (चंद्रपूर) अरुण नामदेवराव कापडे
7. भोकर (नांदेड) भगवान भीमराव कदम
8. नांदेड उत्तर (नांदेड ) धनंजय उत्तमराव सूर्यवंशी
9. जिंतूर (परभणी) बालाजी माधवराव शिंदे
10. श्रीगोंदा (अहमदनगर) टिळक गोपीनाथराव भोस
11. उस्मानाबाद (उस्मानाबाद) डॉ.संदीप माणिकराव तांबारे
12. म्हाडा (सोलापूर) दिनेश गोपीनाथराव जगदाळे
13. सोलापूर उत्तर (सोलापूर) सोमनाथ विजय राऊत
14. पंढरपूर (सोलापूर) किरण शंकरराव घाडगे
15. तासगाव कवठेमहाकाळ (सांगली) ऋतुराज जयसिंगराव पवार

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like