Maharashtra Assembly Session | 8 मजली मातोश्रीच्या पायऱ्या चढताना…’, शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Assembly Session | आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. काल विधानसभेच्या पायऱ्यांवर आमदारांमध्ये राडा झाल्यानंतर आज शिंदे गटाने (Shinde Group) सकाळी शिवसेनेचे आमदार (Shivsena MLA) आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray) यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना लक्ष्य केलं. तसेच आदित्य ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी (Maharashtra Assembly Session) करण्यात आली. यानंतर भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला. सध्या दोन मातोश्री (Matoshree) असून आम्ही तीन मजली मातोश्रीचं पावित्र्य राखतो. आठ मजली मातोश्रीच्या पायऱ्या चढताना पाय दुखतात असे भरत गोगावले यांनी म्हटले.

 

अधिवेशनाच्या शेवटच्या (Maharashtra Assembly Session) दिवशी घोषणाबाजी केल्यानंतर भरत गोगावले म्हणाले, आम्ही पोस्टर, बॅनरच्या माध्यमातून वस्तुस्थिती मांडली आहे. सध्या मातोश्री दोन झाल्या आहेत. एक मातोश्री तीन मजली असून दुसरी मातोश्री आठ मजली आहे. आम्ही तीन मजली मातोश्रीचे पावित्र्य राखतोय. आठ मजली मातोश्रीच्या पायऱ्या चढताना पाय दुखतात असे गोगावले यांनी म्हटले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री कंत्राटी असल्याचे वक्तव्य केले होते. यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, कंत्राटी कर्मचारी 240 दिवसांनंतर कायम कामगार होतो. शिंदे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आंदोलकांच्या घोषणा काही वेळ ऐकल्या. त्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे शिवसैनिक लढत आहेत की रडत आहेत हे पाहिले असल्याचे गोगावले म्हणाले.

 

ते पुढे म्हणाले, विरोधकांनी तीन दिवस घोषणाबाजी केली तर आम्ही दोन दिवस घोषणाबाजी केली. आम्ही केलेली घोषणाबाजी त्यांना बोचली. आम्हाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न करु नये, आमच्या अंगावर कोणी येऊ नये असा इशारा गोगावले यांनी दिला. प्रत्येकाने आपल्या मर्यादेत राहावे. आम्ही बांगड्या घातल्या नाहीत. आम्ही मर्द आहेत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत अशा शब्दात गोगावले यांनी विरोधकांना ठणकावलं.

युवराजांची ‘दिशा’ नेहमीच चुकली
शिंदे गटातील आमदारांकडून आदित्य ठाकरेंना टार्गेट करणारे बॅनर झळकवण्यात आले.
या बॅनरवर आदित्य ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्राचे परमपूज्य युवराज असा केला आहे.
महाराष्ट्राचे परमपुज्य (प पु) युवराज… 2014 ला 151 चा हट्ट धरुन युती बडवली.
2019 ला खुर्चीसाठी हिंदुत्ववादी (Hindutva) विचारधारा पायदळी तुडवली.
पर्यटन (Tourism) खाते घेऊन घरातच बसून केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर.
पुन्हा निवडणूक लढवायची देतात ठसन, स्वत: आमदार व्हायला महापौर व दोन MLC चे लागते कुशन… खुर्चीत बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार,
सत्ता गेल्यावर फिरतात दारोदार… जनता हे खोटे अश्रू पुसणार नाही… तुमच्या या खोट्या रडगाण्याला भूलणार नाही.
युवराजांची ‘दिशा’ नेहमीच चुकली, अशा आशयाचा बॅनर शिंदे गटातील आमदारांनी हातात धरला होता.

 

Web Title :- Maharashtra Assembly Session | shivsena rebel shinde group bharat gogawale critize on shivsena chief uddhav thackeray maharashtra assembly session

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | महिला पोलिसाशी अनैतिक संबंध, अर्धनग्न फोटो मित्रांना दाखवत केली बदनामी; पोलिस कर्मचाऱ्याला अटक

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 50 हजारांची लाच मागणारा कनिष्ठ अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Police Recruitment Exam Scam | पोलीस भरती परीक्षा घोटाळ्यातील 6 रॅकेटचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 56 जणांना अटक