मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणी ATS कडून दोघांना अटक; मुंबईच्या निलंबीत पोलिस कर्मचार्‍यासह बुकीचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंब्रा खाडीत मृतदेह सापडलेल्या मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणी एटीएसने ताब्यात घेतले आहे.. सध्या या दोघांना अटक करण्याची प्रक्रिया एटीएसच्या कार्यालयात सुरु आहे. त्यांना आज दुपारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे समजते.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉपिओ सापडली होती. ही स्कॉपिओ मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. या घटनेपूर्वीच हिरेन यांनी आपली कार हरविली असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. सहायक पोलीस निरीखक सचिन वाझे यांनी हिरेन यांचा खुन करविला असल्याचा आरोप हिरेन यांच्या पत्नीने केला आहे. त्यानंतर एनआयएने स्फोटक प्रकरणी सचिन वाझे यांना अटक केली आहे. त्याबरोबरच मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणही एनआयएकडे सुपूर्त करण्याची मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर एटीएसने दोघांना ताब्यात घेतले आहे.

हिरेन यांच्या व या दोघांचा मोबाईल लोकेशनवरुन त्यांच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. त्यांना आज दुपारी ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतरही पोलिसांकडून याबाबत अधिक माहिती उघड केली जाण्याची शक्यता आहे. अखेर एटीएसने मुंबई पोलिस दलातील निलंबीत पोलिस कर्मचारी विनायक बाळासाहेब शिंदे (51) आणि बुकी नरेश रमणिकलाल गोर (31) यांना अटक केली आहे.