Maharashtra Bhushan Award | महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात अनेकांना उष्माघाताचा त्रास, 8 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Padmashri Dr. Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने (Maharashtra Bhushan Award) गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ (Maharashtra Bhushan Award) पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर (Central Park Ground) महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून अनेक जण आले होते.

 

‘महाराष्ट्र भूषण’ (Maharashtra Bhushan Award) पुरस्काराच्या कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. भव्यदिव्य कार्यक्रम भर उन्हात घेतल्याने काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. उष्माघाताचा (Heat Stroke) त्रास होऊ लागताच अनेकांना एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) दाखल करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी अत्यावस्थ झालेल्याची चौकशी केली.

 

 

कार्य़क्रमादरम्यान जवळपास सव्वाशेच्या आसपास लोकांना डिहायड्रेशनची (Dehydration) तक्रार केली.
त्यांना तातडीने घटनास्थळी असलेल्या 30 मेडिकल बूथमध्ये नेण्यात आले. 13 रुग्णांना विशेष उपचाराची आवश्यकता होती.
त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मैदान भरले होते.
श्री सदस्य यांच्या अनुयायांना कोणतीही सोय करण्यात आली नव्हती. त्यामुळे ते भर उन्हात कार्य़क्रम पाहत होते.
त्यांना शेडची सुद्धा व्यवस्था केली नव्हती.

 

Web Title :-  Maharashtra Bhushan Award | Many suffer from heat stroke in Maharashtra Bhushan program, 8 people die, Chief Minister announces 5 lakh aid

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | राज्यातील सरकार स्थिर…, अजित पवारांच्या विधानावर जयंत पाटील म्हणाले…

MVA Vajramuth Sabha | ‘वज्रमूठ सभे आधीच काँग्रेसमधील नाराजी चव्हाट्यावर’, ‘या’ दिग्गज नेत्याची दांडी

BARTI Pune | बार्टी संस्थेच्यावतीने विविध उपक्रमांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Maharashtra Political News | अजित पवारांसह ‘या’ दोन नेत्यांची अमित शहांबरोबर बैठक झाली, शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा