Maharashtra Board Exam | राज्यात 10 वी आणि 12 वी च्या परीक्षांच्या तारखा जाहीर (VIDEO)

Maharashtra Board Exam | 10th Maharashtra board exams march 15 12th march onwards said education minister varsha gaikwad
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दहावी (10th Exam) आणि बारावीच्या (12th Exam) परीक्षाबाबतीतील (Maharashtra Board Exam) संभ्रम दूर झाला असून त्या नियमित मृल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच (Offline Exam) होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले आहे. दहावीच्या परीक्षा (Maharashtra Board Exam) या 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत होणार आहेत. त्याचसोबत बारावीच्या लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत पार पडणार आहेत.

 

 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन या परीक्षा नियमित पद्धतीने होणार असल्याची माहीती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. इयत्ता 12 वीचा निकाल (Result) जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तर 10 वीचा निकाल जुलै 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील. कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे (Corona Prevention Regulations) काटेकोर पालन करुनच सर्व परीक्षा पार पडतील असे गायकवाड यांनी सांगितले. (Maharashtra Board Exam)

 

 

तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आमची प्राथमीकता आहे.
सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याआगोदर परीक्षा वेळापत्रक, पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा,
मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करुन त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

 

Web Title :- Maharashtra Board Exam | 10th Maharashtra board exams march 15 12th march onwards said education minister varsha gaikwad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

SBI Rates Hike | स्टेट बँकेने वाढवला व्याजदर! आता महाग झाले कर्ज, द्यावा लागेल जास्त EMI

Amitabh Bachchan | ‘आज रपट जाये’ या गाण्यांमध्ये अमिताभ बच्चनमुळं पूर्ण रात्र झोपू शकली नव्हती स्मिता पाटील, जाणून घ्या किस्सा

 

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 122 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Total
0
Shares
Related Posts