Maharashtra Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या बैठकीतील 12 निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक (Maharashtra Cabinet Decision) पार पडली. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसा वीज नसलेल्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी कधीही उठून शेतात पाणी देण्यासाठी जावे लागते. शेतकऱ्यांची ही समस्या ओळखून शेती पंपाना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा (Uninterrupted Power Supply) करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) घेण्यात आला. राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 (Chief Minister Solar Agriculture Channel Scheme) राबवली जाणार आहे. 2025 पर्यंत 30 टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा केला जाणार आहे.

मंत्रिमंडळ बैठक निर्णय (Maharashtra Cabinet Decision)

1. राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करणार. दिव्यांग कर्मचा-यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू (सामान्य प्रशासन )

2. शेती पंपाना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ राबविणार. वर्ष २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा (ऊर्जा विभाग)

3. पुनर्जीवित किंवा पुनरर्चित साखर कारखाना, सूतगिरणीच्या कामकाजासाठी तात्पुरती समिती नेमणार. सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा (सहकार)

4. महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) उपकंपनी स्थापणार. मागास, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणार (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य)

5. राज्यातील अकृषि विद्यापीठामधील शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी (उच्च व तंत्र शिक्षण)

6. आता बी.एस्सी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या आंतरवासिता विद्यार्थाना विद्यावेतन मिळणार (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये)

7. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राखीव जागांकरिता नामनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ (ग्राम विकास)

8. खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षण पदावरील निवडीकरिता खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक नाही (महिला व बालविकास)

9. पुणे जिल्ह्यातील दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) हे न्यायालय स्थापन करणे व पदे निर्माण करण्यास मान्यता. (विधी व न्याय)

10. अमरावती येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास व आवश्यक पदनिर्मितीस मान्यता‌. (विधी व न्याय)

11. पुणे पालिका हद्दीत निवासी मालमत्तांना दिलेली सवलत कायम तसेच दुरुस्तीपोटी फरकाची रक्कम वसूल न करण्याचा निर्णय (नगरविकास विभाग)

12. मराठी भाषा भवनाच्या सुधारित आराखड्याचे सादरीकरण. मंत्रिमंडळाची मान्यता (मराठी भाषा विभाग)

Web Title :- Maharashtra Cabinet Decision | cabinet meeting decisions farmer provide uninterrupted power supply to agricultural pumps during the day

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Property Tax | पुणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात ४० टक्के सवलत पुन्हा लागू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

Maharashtra Political News | ‘अजित पवारांबाबत बातम्या पसरवण्यास राऊतांनी सुरुवात केली’, भाजप नेत्याचा संजय राऊतांवर निशाणा

Nashik MNS | नाशिक मनसेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा तडकाफडकी राजीनामा