Maharashtra Cabinet Decision | शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नैसर्गिक आपत्तीची (Natural Disaster) व्याख्या बदलण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे. यापुढे सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. 10 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस सलग पाच दिवस पडला तर नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला हा निर्णय (Maharashtra Cabinet Decision) शेतकऱ्यांच्या (Farmers) खूप फायदाचा आहे. कारण या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) म्हणाले, पाऊस पडून जे शेतकऱ्यांचे नुकसान होतं. यावर आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये (Maharashtra Cabinet Decision) चर्चा झाली. सलग पाच दिवस पाऊस पडून नुकसान झालं तर मदतीची तरतूद करणारा प्रस्ताव आजच्या बैठकीत मांडण्यात आला. यावर चर्चा झाली. त्यामध्ये आणखी बदल केल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यासंदर्भात अंतिम निर्णय येत्या काही दिवसांत जाहीर करतील.

मंत्रीमंडळातील इतर महत्त्वाचे निर्णय

– शेतक-यांना मदत करण्याकरिता सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित
– ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार. सुधारित रेती धोरणास मान्यता. रेती लिलाव बंद
– नागपूर मेट्रो रेल (Nagpur Metro Rail) टप्पा- 2 प्रकल्पास सुधारित मान्यता 43.80 किमीचा मेट्रो मार्ग उभारणार
– देवनार डम्पिंग मैदानावर (Deonar Dumping Ground) कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल
– सेलर इन्स्टिट्यूट “सागर” भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण
– अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार. सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील 14 पदे निर्माण करणार
– महावितरण कंपनीस (Mahavitran Company) कर्ज घेण्यास शासन हमी
– अकृषी विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता
– नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्याकरिता परिस स्पर्श योजना

Web Title :-  Maharashtra Cabinet Decision | if there is more than 10 mm of rain for five consecutive days it will be considered as a natural disaster cabinet meeting decision

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘फडणवीसांना गृहमंत्री पदावरून हटवा किंवा त्यांचा राजीनामा घ्या’, ठाकरे गटाच्या खासदाराने घेतली अमित शहांची भेट

NCP MLA Rohit Pawar | ‘छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा नेता फडणवीसांसोबत पहिल्या रांगेत’, रोहित पवारांचा संताप, म्हणाले- ‘महाराष्ट्राच्या जखमेवर…’

Maharashtra Cabinet Expansion | सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच, राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मोठी माहिती आली समोर