Maharashtra Politics News | ‘फडणवीसांना गृहमंत्री पदावरून हटवा किंवा त्यांचा राजीनामा घ्या’, ठाकरे गटाच्या खासदाराने घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Politics News | शिंदे गट (Shinde Group), भाजप (BJP) आणि ठाकरे गटात (Thackeray Group) वाढत असलेल्या संघर्षामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अशातच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या महिला कर्यकर्तीला मारहाण केल्यामुळे शिंदे, भाजप आणि ठाकरे गटातील संघर्ष अधिक वाढला (Maharashtra Politics News) आहे. ठाण्यात घडलेल्या घटनेवरुन ठाकरे गटाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यातच ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (MP Priyanka Chaturvedi) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली आहे.

अमित शाह यांच्या भेटीबाबत प्रियंका चतुर्वेदी यांना विचारले असता त्या म्हणाल्या, अमित शाह यांना सांगितले की, महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या भूमिकेबाबत (Maharashtra Politics News) अहवाल मागण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील संस्कार आणि संस्कृती कधीही महिलांबरोबरच्या अशा मारहाणीचे प्रकार सहन करणार नाही. मी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

फडणवीसांना हटवा किंवा राजीनामा घ्या

पोलिसांनी (Maharashtra Police) त्यांचे काम केले पाहिजे आणि त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव येऊ नये.
ज्यांनी हे काम केले त्यांना शिक्षा झाली पाहिजे. महाराष्ट्राचे गृहमंत्री प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत.
त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. त्यांना पदावरुन हटवणे, त्यांचा राजीनामा घेणे हेही योग्य ठरेल.
कारण महाराष्ट्राचे गृहमंत्री अपयशी ठरले आहेत, अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली.

अमित शाह यांचे आश्वासन

अमित शाह यांच्या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेबाबत सांगताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या,
मी अमित शाहांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली आहे. त्यावर ते मला म्हणाले की, आम्ही दोषींवर कारवाई करु.
याबाबत त्यांनी आश्वासन दिल्याचे चतुर्वेदी यांनी सांगितले.

Web Title :- Maharashtra Politics News | thackeray Group mp priyanka chaturvedi tell why she meet hm amit shah

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, पण अजित पवारांनी कधीच विश्वासघात केला नाही’

Pune Crime News | माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी, ३० लाखाच्या खंडणीची मागणी