Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप संघाची विजयाची हॅट्रीक; न्युट्रीलिशियसचा दुसरा विजय !!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Indrani Balan Winter T20 League 2022 | बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने स्पर्धेत विजयाची हॅट्रीक नोंदवली. न्युट्रीलिशियस संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून दुसर्‍या विजयाची नोंद केली. (Indrani Balan Winter T20 League 2022)

 

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ओम पवार याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर न्युट्रीलिशियस संघाने एसके डॉमिनेटर्स संघाचा ५८ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना न्युट्रीलिशियसने १७३ धावा धावफलकावर लावल्या. अक्षय पी. (५३ धावा), हृषीकेश राऊत (३५ धावा) आणि श्रेयस वालेकर (२४ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानाला उत्तर देताना एसके डॉमिनेटर्सचा डाव ११५ धावांवर मर्यादित राहीला. न्युट्रीलिशियसच्या ओम पवार याने १८ धावात ३ गडी टिपले आणि सामनावीर हा मान पटकावला. (Indrani Balan Winter T20 League 2022)

आतिश कुंभार याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुनित बालन ग्रुप संघाने द गेम चेंजर्स संघाचा ३४ धावांनी पराभव करून सलग तिसरा विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुपने २०६ धावांचा डोंगर उभा केला. मेहूल पटेल याने ६२ धावांची तसेच प्रीतम पाटील याने सुद्धा ६२ धावांची खेळी करून संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. या धावसंख्येचा पाठलाग करताना द गेम चेंजर्स संघाचा डाव १७२ धावांवर संपुष्टात आला. रोहन दामले (४२ धावा), देवदत्त नातू (३४ धावा) आणि सुरज शिंदे (२८ धावा) यांनी धावा जमवित प्रतिकार केला. पुनित बालन ग्रुपचा आतिश कुंभार याने ३२ धावात ३ गडी टिपत महत्वपूर्ण कामगिरी केली. सागर सावंत (३-२५) आणि अक्षय दरेकर (२-३३) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय सोपा केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
न्युट्रीलिशियसः १९ षटकात ७ गडी बाद १७३ धावा (अक्षय पी. ५३ (४३, ५ चौकार, ३ षटकार),
हृषीकेश राऊत ३५, श्रेयस वालेकर २४, ए. नलावडे २३, ओंकार मोहीते ३-३७)
वि.वि. एसके डॉमिनेटर्सः १४.५ षटकात १० गडी बाद ११५ धावा (अजय बोरूडे २८, यश माने २२,
ओम पवार ३-१८, नवीन कटारीया २-१२, अनिश पालेशा २-२०); सामनावीरः ओम पवार

 

पुनित बालन ग्रुपः २० षटकात ५ गडी बाद २०६ धावा (मेहूल पटेल ६२ (४५, ६ चौकार, २ षटकार),
प्रीतम पाटील ६२ (३८, ५ चौकार, ५ षटकार), धनराज शिंदे २९, संकेत फाराटे २-३७)
वि.वि. द गेम चेंजर्सः १८.४ षटकात १० गडी बाद १७२ धावा (रोहन दामले ४२, देवदत्त नातू ३४,
सुरज शिंदे २८, आतिश कुंभार ३-३२, सागर सावंत ३-२५, अक्षय दरेकर २-३३); सामनावीरः आतिश कुंभार

 

Web Title :- Maharashtra Cabinet Decision | maharashtra cabinet decision shinde fadnavis government cabinet meeting decision of mega recruitment electricity bill seventh pay commission

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Sanjay Raut | सीमावादावरुन संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘त्या लोकांना घालवण्यासाठी पुन्हा…’

MNS Chief Raj Thackeray | आम्ही फक्त प्रश्न सोडवायला असतो, आम्हाला कोणी मते देत नाही – राज ठाकरे

Anupam Kher | काश्मीर फाइल्सवर झालेल्या टीकेनंतर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करत दिले ‘हे’ प्रतिउत्तर