Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तार का रखडला, दीपक केसरकर यांनी सांगितलं कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांचा शपथ विधी होऊन एक महिना झाला. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झालेला नाही. विरोधक यावरुन सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. शिंदे आणि फडणवीस लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होईल असं सांगत असले तरी विस्तार का रखडला आहे ? याबाबत आतापर्यंत दोन्ही पक्षांकडून काहीही सांगण्यात येत नव्हतं.

 

कोणाला किती मंत्रिपदं द्यायची ? दोन्ही पक्ष आणि अपक्षांसाठीचा मंत्रिमंडळ फॉर्म्युला काय ? यावरुन विस्तार रखडल्याचं बोललं जात होतं. पण आता शिंदे गटाचे प्रवक्ते (Shinde Group Spokesperson) दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रखडल्याचं खरं कारण सांगितले आहे. पक्षांतर्गत लोकशाही असावी की नाही हे सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालावरुन समजेल. विस्ताराला वेळ लागला तरी चालेल, पण सुप्रीम कोर्टाचा आदर राखणं गरजेचं आहे आणि तो आमच्याकडून राखला जात आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार केला नाही. सोमवारी अंतरिम आदेश येईल आणि त्यानंतर विस्तार होईल, अशी माहिती केसरकर यांनी दिली.

 

भाजपकडून कोणाला संधी मिळणार ?

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), गिरीश महाजन (Girish Mahajan), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe), बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar), प्रवीण दरेकर (Pravin Darekar), रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan), नितेश राणे (Nitesh Rane)

 

शिंदे गटाकडून कोणाला संधी मिळणार ?

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), उदय सामंत (uday Samat), दादा भुसे (Dada Bhuse), शंभूराज देसाई (Shambhuraj Desai),
अब्दुल सत्तार (Abdul Sattar), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), संदीपान भुमरे (Sandipan Bhumare), संजय शिरसाट (Sanjay Shirsat)

 

अपक्षांपैकी बच्चू कडू (Bachu Kadu) किंवा रवि राणा (Ravi Rana) यांना संधी मिळू शकते, यात बच्चू कडू यांचं पारडं जड आहे.

 

Web Title :-  Maharashtra Cabinet Expansion | deepak kesarkar finally reveals reason for no cabinet expansion of shinde fadnavis government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा