Maharashtra Cabinet Expansion | अखेर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळाला ?, 10 जण घेणार शपथ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion | महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) सत्तेत येऊन 15 दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झालेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून टीका होत आहे. पण आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये (Presidential Election) कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी 19 ते 21 जुलै दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. यावेळी केवळ 10 मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे.

 

मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होत नसल्याने विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
पण फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये कुणा – कुणाला मंत्रिपद द्यायचे यावरुन अजूनही एक वाक्यता आलेली नाही.
शिवसेना बंडखोर आमदारांच्या (Shivsena Rebel MLA) नाराजीची भीती आणि भाजपमध्ये (BJP) सुरु असलेली रस्सीखेच यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला आहे.
पण आता होऊ घातलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
त्यामुळे इच्छुकांचा भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राष्ट्रपतिपदाची निवडणूक झाल्यानंतर 19 किंवा 21 जुलै रोजी मोजक्या 10 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे, असे वृत्त एका वेबसाईटने दिले आहे.

पहिल्या टप्प्यात 8 ते 10 मंत्र्यांच्या शपथविधी (Swearing In) होणार असल्याची माहिती आहे.
यामध्ये शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश असेल. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार आणि अपक्ष आमदार अशा जवळपास 50 पेक्षा जास्त आमदारांनी बंड केलं.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत मागच्या सरकारमधले 8 मंत्रीही सहभागी होते.
त्यामुळे त्यांनाही नव्या मंत्रिमंडळात आपल्याला स्थान असेल अशी अपेक्षा आहे.

 

या मंत्रिमंडळामध्ये भाजपला 29 कॅबिनेट मंत्रीपद हवी आहेत. तर शिंदे गटाला 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री अशी 13 मंत्रिपद हवी आहेत.
शिंदे गटात आधीच शिवसेनेचे सात मंत्री आहेत.
शिंदे गटात 40 बंडखोर आणि 10 अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे शिंदे गटाला जास्त मंत्रिपद हवी आहेत.
6 आमदारांमागे एक मंत्रिपद अशी अट शिंदे गटाकडून घालण्यात आली असून 19 मंत्रिपद हवी अशी मागणी आहे.
त्यामुळे भाजपने याला होकार दिला नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे.

 

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | eknath shinde devendra fadnavis government cabinet expansion will take place next week only 10 people will take oath

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा