Maharashtra Cabinet Meeting | रवी राणांसोबतचा वाद मिटताच बच्चू कडूंना शिंदे-फडणवीसांकडून मोठं गिफ्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Meeting | आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) आणि रवी राणा (MLA Ravi Rana) याच्यात मागील 15 दिवसांपासून सुरु असलेला वाद राज्यात चांगलाच गाजला. त्यांच्यातील आरोप प्रत्यारोप विकोपाला गेले होते. अखेर रवी राणांनी 31 ऑक्टोबरला या वादावर पडदा टाकला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीनंतर राणा यांनी आपली तलवार म्यान केली. यानंतर दुसऱ्याच दिवशी बच्चू कडूंना शिंदे फडणवीस यांच्याकडून रिटर्न गिफ्ट मिळालं आहे. बच्चू कडू यांच्या अचलपूर मतदारसंघातील (Achalpur Constituency) सपन प्रकल्पाला 495.29 कोटींची सुधारीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) हा निर्णय घेण्यात आला.

6134 हेक्टरला सिंचनाचा लाभ

अमरावती जिल्ह्यातील सपन मध्यम प्रकल्प (Sapan Medium Project) 495.29 कोटींची सुधारीत मान्यता
देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) घेण्यात आला.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर 6134 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. हा प्रकल्प बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय

1. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना. अनुसूचित क्षेत्राबाहेरील गावांमध्येही विकास कामांसाठी निधी (आदिवासी विकास विभाग)

2. अमरावती जिल्ह्यातील सपन मध्यम प्रकल्प ४९५.२९ कोटींची सुधारीत मान्यता. 6134 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ (जलसंपदा विभाग)

3. राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनच्या चौथ्या टप्प्यास मान्यता. (महिला व बाल विकास विभाग)

Web Title :-  Maharashtra Cabinet Meeting | maharashtra cabinet eknath shinde and devendra fadnavis approve fund for irrigation project in bacchu kadu constituency

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | अखेर पोरवाल रस्त्याच्या पर्यायी रस्त्यांचा मार्ग मोक़ळा, मार्थोपोलिस शाळेची जागा देण्यास मंजुरी; आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश

Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरात होणार तुफान राडा!