Maharashtra Cabinet Meeting | शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेट बैठकीतील 10 मोठे निर्णय, मविआला धक्क्यावर धक्के

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Meeting | महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Govt) कोसळल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाले. यानंतर या सरकारने आगोदरच्या सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द करण्याची मालिकाच सुरु ठेवली आहे. नव्याने स्थापन झालेल्या सरकारची आज पाचवी मंत्रिमंडळ बैठक (Maharashtra Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अध्यक्ष होते. या बैठकीत एकूण 10 निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी एक निर्णय हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय मानला जातोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) आणि महापालिकेच्या निवडणुकांसाठी (Municipal Election) 2017 साली जी प्रभाग रचना (Ward Composition) होती तीच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय.

 

मंत्रिमंडळ बैठकीतील 10 निर्णय 

1. मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा

मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेत सध्याच्या 236 सदस्यांऐवजी 227 सदस्य संख्या होईल. तसेच  इतर महानगरपालिकांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्येत सुधारणा होणार आहे ती खालील प्रमाणे…

3 लाखांपेक्षा अधिक व 6 लाख पर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांची किमान संख्या 65 इतकी तर कमाल संख्या 85 इतकी असेल. 3 लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक 15 हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. 6 लाखांपेक्षा अधिक व 12 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या 85 इतकी तर कमाल संख्या 115 इतकी असेल. 6 लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक 20 हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. 12 लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक 40 हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. 24 लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक 50 हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.

30 लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक 1 लाख लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. 12 लाखांपेक्षा अधिक व 24 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांची किमान संख्या 115 इतकी तर कमाल संख्या 151 इतकी असेल. 24 लाखांपेक्षा अधिक व 30 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांची किमान संख्या 151 इतकी तर कमाल संख्या 161 इतकी असेल. 30 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांची किमान संख्या 161 इतकी तर कमाल संख्या 175 इतकी असेल.

 

2. जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50

जिल्हा परिषद सदस्यांची (Zilla Parishad Member) संख्या कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सध्या राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कमीत कमी 55 आणि जास्तीत जास्त 85 अशी सदस्य संख्या अशी आहे. ग्रामीण भागातील घटत चाललेल्या लोकसंख्येमुळे सुधारित सदस्य संख्या करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याला किमान 50 जागा देण्यात येतील.  या संदर्भातील अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल.

 

3. भिवंडी कल्याण शीळ फाटा रस्त्याच्या रुंदीकरणास वेग देणार 561 कोटी 85 लाख रुपयांच्या खर्चास सुधारित मान्यता

भिवंडी कल्याण शीळ फाटा रस्त्याच्या (Bhiwandi Kalyan Sheel Phata Road) सहा पदरी रुंदीकरणाला वेग देण्यात येणार असून यातील 561 कोटी 85 लाख रुपयांच्या सुधारित कामांच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
हा प्रकल्प शासनाच्या निधीतून ठेव अंशदान तत्त्वावर राबविण्यात येईल.
पत्री रेल्वे उड्डाण पूल, कटई येथील 2 रेल्वे उड्डाण पूल व विद्युत वाहिन्या व जल वाहिन्या स्थलांतरीत करणे इत्यादी कामांमुळे कामाच्या स्वरुपात बदल झाल्याने हा खर्च वाढला आहे.
या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी व आतापर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास (MSRDC)
शासनाकडून देण्यात आलेला 105 कोटीचा निधी वगळून उर्वरित 456  कोटी 85 लाख इतका निधी शासनाच्या निधीतून महामंडळास हस्तांतरित करण्यात येईल.

 

4. वर्धा बॅरेज उपसा सिंचन योजनेच्या सुधारित खर्चास मान्यता

यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील वर्धा बॅरेज उपसा सिंचन योजनेच्या (Wardha Barrage Upsa Sanchan Scheme)
565 कोटी 87 लाख रुपये किंमतीच्या कामांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
या प्रकल्पामुळे बाबूळगाव तालुक्यातील 5 हजार 663 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.

 

5. लेंडी लघु पाटबंधारे प्रकल्पासाठीच्या खर्चास सुधारित मान्यता

जव्हार तालुक्यातील मौजे हिरडपाडा येथील लेंडी लघु पाटबंधारे प्रकल्प (Lendi Small Irrigation Project) पूर्ण करण्यासाठी 187 कोटी 04 लाख रुपयांच्या कामांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
या प्रकल्पामुळे 5 गावातील 550 हेक्टर आदिवासी क्षेत्र सिंचित होईल.

 

6. व्यापाऱ्यांना जीएसटी विवरण भरणे सोईचे व्हावे म्हणून सुधारणा

व्यापाऱ्यांना वस्तू व सेवा कर विवरण Goods and Services Tax (GST) पत्रके भरताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा 2017 आणि महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा 2017 यामधील तरतुदींमध्ये एकसुत्रता राखण्यासाठी या सुधारणा करण्यात आल्या.
यामुळे करदाते व वस्तू व सेवाकर विभाग यांच्यामध्ये भविष्यातील अडचणी दूर होतील व कार्यपद्धतीचे सुलभीकरण होईल.

 

7. मोटार वाहन विभागासाठी सुधारित आकृतीबंध

राज्याच्या मोटार वाहन विभागासाठी (Department of Motor Vehicles) सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
यामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवरील खर्चाचा भारही कमी होणार आहे.
विभागासाठी 4350 पदांच्या सुधारित आकृतीबंधानुसार नवीन 443 नियमित पदे निर्मिती करण्यात येतील.
यामध्ये सह परिवहन आयुक्त या संवर्गातील 5 नियमित पदांचा देखील समावेश आहे.

 

8. नवीन महाविद्यालयांसाठी इरादापत्रांची मुदत 17 ऑगस्ट

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 (Maharashtra Public Universities Act) मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
या संदर्भातील अध्यादेश निर्गमित करण्यात येईल.
या अधिनियमामुळे महाविद्यालयांना नवीन महाविद्यालये, परिसंस्था सुरु करणे तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय,
विद्याशाखा अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्रे सुरु करण्यासाठी 17 ऑगस्ट 2022 पूर्वी इरादापत्र देता येईल.

 

9. अमृत संस्थेसाठी पदांना मान्यता

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र संशोधन,
उन्नत व प्रशिक्षण प्रबोधन (अमृत) या संस्थेच्या 3 नियमित व 17 कंत्राटी पदांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
यासाठी खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवक आणि युवतींचा विकास घडविण्यासाठी महाज्योतीतील संस्थेच्या धर्तीवर अमृत ही नवीन संस्था 2019 मध्ये स्थापन करण्यात आली आहे.

 

10. माहिती व जनसंपर्क मधील दोन लिपिकांच्या सेवा नियुक्तीच्या दिनांकापासून नियमित

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सेवायोजन कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या 2 लिपिकांच्या नियुक्त्या त्यांच्या मूळ नियुक्तीच्या दिनांकापासून नियमित करण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
लोकराज्य गुजरातीसाठी प्रेमिला कुंढडिया आणि लोकराज्य उर्दू साठी जावेद अब्दूल वाहीद खान यांच्याबाबत हा निर्णय घेण्यात आला.

 

Web Title : – Maharashtra Cabinet Meeting | maharashtra eknath shinde and devendra fadnavis government cabinet ten big decision

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा