मुख्यमंत्र्यानी अण्णांच्या पाया पडून विधानसभा निवडणुकांपर्यंत वेळ मारून नेली

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – काल अण्णा हजारेंच्या उपोषणाचा सातवा दिवस होता, अण्णांनी उपोषण मागे घ्यावं या साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे तब्ब्ल सहा तास राळेगणसिद्धी येथे अण्णांशी चर्चा करत होते. लोकपाल नियुक्ती आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव यांसारख्या अनेक मागण्यासाठी अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारेंचे पाया पडून विधानसभा निवडणूक होईपर्यंत वेळ मारून नेली.असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. काल उपोषणस्थळी जाऊन मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्या पूर्ण करण्याचं अश्वासन दिलं.

उपोषणाच्या सातव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अण्णांनी उपोषण मागे घेतले. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी अण्णांचे पाया पडून निवडणुकांपर्यंत वेळ काढून घेतली असल्याचा आरोप केला आहे.

केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह हे या चर्चेत तीन तास सहभागी झाले होते. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदींनी तब्ब्ल सहा तास अण्णांशी चर्चा केली. आणि त्यानंतर तोडगा निघाला. सरकारने दिलेल्या आश्वासनावर अण्णांनी समाधान मानून आंदोलन मागे घेतले.