Maratha Reservation : CM ठाकरेंचे PM मोदींना पत्र, म्हणाले – ‘केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षण द्या’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. या निर्णयानंतर मराठा समाजातर्फे निषेध व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यानंतर आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेऊन केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत आरक्षण द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, मराठा समाजाला केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत आरक्षण द्यावे. मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि सरकारी नोकरीत 13 टक्के आरक्षण द्यावे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने आजवर केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रातून पंतप्रधानांना दिली आहे. यात सरकारने आणलेला अद्यादेश, गायकवाड आयोग, विधीमंडळात केलेला कायदा आदीची माहिती दिली आहे.