महाराष्ट्र काँग्रेसची ४८ लोकसभा मतदार संघात आढावा बैठक आयोजित 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – २०१९ ची अगामी निवडणूक जवळ आली आहे. सर्वच पक्षांनी अागामी निवडणुकांची तयारी सुरु केली आहे.  तसेच काँग्रेसची राष्ट्रवादीसोबत आघाडीची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान काँग्रेसने  राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक आयोजित केली आहे.
भाजपा सरकार विरोधात सर्व पक्ष एकत्र यावे म्हणून जोराचे प्रयत्न सुरु आहेत.  याचदरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण १५ , १६ , आणि १७ नोव्हेंबरला प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये बैठक घेणार आहेत.
विशेष म्हणजे  या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राज्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
गुरुवार १५ नोव्हेंबर रोजी  मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या राज्यांचा आढावा घेतल्या जाणार आहे . तर शुक्रवार १६ नोव्हेंबरला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या राज्यांचा आढावा घेतल्या जाणार आहे तर शनिवार १७ नोव्हेंबरला कोकण विभागाचा आढावा घेतल्या जाणार आहे.