मुंबई : Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis | मेडीगट्टा प्रकल्पाच्या (Medigatta Project) बुडित क्षेत्रात (Back Water) येणाऱ्या जमिनीचे संपादन करण्याची कार्यवाही सुरु आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यांना नुकसानभरपाई देण्यात येत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी दिली.
विधानपरिषदेत सदस्य रामदास आंबटकर (Ramdas Ambatkar) यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,
मेडीगट्टा प्रकल्पामुळे बुडित क्षेत्रात येणाऱ्या एकूण 18 गावांतील 369.13 हेक्टर खासगी जमिनींपैकी 234.92
हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून उर्वरित जमीन संपादनाची कार्यवाही सुरु आहे.
यापूर्वी थेट खरेदीने ताब्यात घेतलेल्या जमिनीला देण्यात आलेले मूल्यांकन विचारात घेऊन संबंधित जमीन मालकास वाजवी मोबदला मिळण्याच्या दृष्टीने निवाडा करुन भूसंपादन प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
Web Title :- Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Maharashtra Proceedings of land acquisition for Medigatta project started – Deputy Chief Minister Devendra Fadnavis
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update