Women Maharashtra Kesari | पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या मुलीने पटकावला पहिला ‘महिला महाराष्ट्र केसरी’ होण्याचा मान

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात यंदा पहिल्यांदाच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे (Women Maharashtra Kesari) आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा सांगली येथे पार पडली. कल्याणची वैष्णवी पाटील (Vaishnavi Patil) आणि सांगलीची प्रतिक्षा बागडी (Pratiksha Bagdi) यांच्यात महिला महाराष्ट्र केसरचा (Women Maharashtra Kesari) अंतिम सामना झाला. यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सांगलीच्या प्रतिक्षा बागडीने बाजी मारली आणि प्रथम महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला.

उपांत्य फेरीत दोघींनी आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर विजय मिळविले. प्रतिक्षाने कोल्हापूरच्या अमृता पुजारीवर (Amrita Pujari) 9-2 असा विजय मिळवला. या लढतीत प्रतिक्षाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. प्रतिक्षाला यावेळी दोन गुण गमवावे लागले. मात्र यानंतर तिने 9 गुणांची कमाई करत अमृता पुजारीचा पराभव केला. (Women Maharashtra Kesari)

वैष्णवीने उपांत्य फेरीच्या लढतीत कोल्हापूरच्या कुशप्पाचा 11-1 असा दमदार विजय मिळवला. वैष्णवी या सामान्यात फॉर्मात होती. तिने कुशप्पाना सामना सुरु असताना मान वर काढून देण्याची संधी दिली नाही. त्यामुळे तिने धडाकेबाज खेळ करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

प्रतिक्षा ही वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली (Vasantdada Wrestling Center Sangli) येथे कुस्तीचे धडे घेत आहे. तिला घरातून कुस्तीचे बाळकडू मिळाले आहे. तिचे वडील रामदास बागडी (Ramdas Bagdi) हे जुन्या काळातील नामवंत पैलवान आहेत. ते सध्या सांगली पोलीस दलात (Sangli Police Force) कार्यरत आहेत. प्रतिक्षाने आजपर्यंत 12 वेळा राज्य स्पर्धेत पदके प्राप्त केली आहेत तसेच 22 वेळा राष्ट्रीय पातळीवर सहभाग घेतला आहे. सध्या ती के.बी.पी. कॉलेज इस्लामपूर येथे पहिल्या वर्षात शिकत आहे.

वैष्णवी पाटील ही मांगरुळ कल्याणची कुस्तीगीर असून तिचे वडील दिलीप पाटील (Dilip Patil)
हे शेतकरी आहेत. त्यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. घरात कुस्तीचा कोणताही वारसा नसताना
तिच्या वडिलांनी तिच्या कुस्तीच्या प्रेमापोटी तिला कुस्तीत उतरवले. वस्ताद पंढरीनाथ ढोणे
बापूंच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करते. तिने आजपर्य़ंत अनेक स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे.
वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई तिने केली आहे. आजवर तिने दहा पदके मिळवली आहेत.

Web Title :- Women Maharashtra Kesari | sangli police officer daughter
pratiksha-bagadi-beat-vaishanavi-patil-and-became-1st-women-maharashtra-kesari-winner-2023

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Rahul Gandhi Disqualification | शिक्षा झाली मात्र आमदारकी गेली नाही, राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर महाराष्ट्रातील ‘हे’ आमदार चर्चेत

Maharashtra Industries Minister Uday Samant On Satara MIDC | सातारा जिल्ह्यातील प्रस्तावित औद्योगिक वसाहती जिल्ह्यातच राहणार – उद्योग मंत्री उदय सामंत