Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis | औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेच्या संदर्भात लवकरच धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis | औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेच्या (ॲश) (Ash from Thermal Power Plant) संदर्भात लवकरच धोरण तयार करण्यात येत आहे. तसेच वाहनातून होणाऱ्या कोळसा चोरीला आळा बसवण्यासाठी कोळशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर CCTV आणि ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी दिली.
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य उमा गिरीष खापरे (MLC Uma Girish Khapre) यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री फडणवीस (Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis) म्हणाले की,
औष्णिक विद्युत प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या राखेच्या अनुषंगाने आपण धोरण तयार करीत आहोत.
तसेच या राख वाहतुकीच्या अनुषंगाने निविदा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये संबंधित वाहनांवर सीसीटीव्ही,
व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम (Vehicle Tracking System) असणे आवश्यक असणार आहे.
तसेच ही राख स्थानिकांना व्यवसायासाठी सवलतीच्या दराने उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिथे जिथे ॲशबंड्स तयार झाले आहेत, त्याठिकाणी निश्चित कालावधीत ऑडीट करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
यावेळी सदस्य एकनाथ खडसे (Eknath Khadse), अभिजीत वंजारी
(Nagpur Congress MLA Abhijeet Wanjari) यांनी उपप्रश्न विचारले. त्यालाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.
Web Title :- Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis Policy regarding ash from thermal power plants soon – Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update