पुण्यात Lockdown? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढत असल्याने देशात सार्वधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यात आहेत. राज्याच्या तुलनेत वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. तर यामधील पुण्यातही रुग्ण वाढताना दिसत आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील स्थितीबाबत माहिती दिली असून लॉकडाउनसंबंधीही भाष्य त्यांनी केलं आहे. त्यावेळी अजित पवार हे मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, राज्यातील काही शहरात स्थितीचा आढावा घेऊन लॉकडाउनचे निर्बंध लागू केले आहे. तर मोठ्या प्रमाणात कोरोनाचं संकट वाढू लागलं असल्याने मुख्यमंत्र्यांसहित सर्वजण आवाहन करत आहेत. काही शहरांमध्ये प्रमाण वाढलं आहे. पुण्याचे पालकमंत्री नात्याने उद्या पुण्यात लोकप्रतिनिधींना उपस्थित राहण्यास सांगितलं असून, दर शुक्रवारी अधिकाऱ्यांसोबत बैठक होत असते. या बैठकीत आम्ही निर्णय घेतो. लॉकडाउनसंदर्भात मतांतर आहे, परंतु, नियमांचं पालन केलं पाहिजे यावर एकमत आहे, असे पुण्याच्या लॉकडाउनसंदर्भात त्यांनी भाष्य केलं आहे. तर उद्या अजित पवार हे पुण्याच्या लॉकडाउनबाबत काय निर्णय घेतात याकडे लोकांचं लक्ष असणार आहे.

दरम्यान, पक्षीय राजकारण मधे न आणता हे आपल्या सर्वांवरचं संकट आहे या भावनेने आपण कोरोनाशी लढलं पाहिजे. आम्ही ४५ वर्षापुढील सर्वांचं लसीकरण करण्याची मागणी केली होती ती मान्य झाली आहे त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार. तर ४५ वर्षाच्या आतील अनेकांना कोरोना होत आहे. देवगिरी जिथे मी राहतो तिथे अनेक कर्मचारी वास्तव्यास आहेत. काल सगळ्यांची तपासणी केली तर नऊ लोक पॉझिटिव्ह होते. आपल्याला कोरोनाचा मुकाबला करावाच लागणार आहे. त्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून आर्थिक मदत कम कमी पडू न देण्याची भूमिका आहे, असे अजित पवारांनी सांगितलं आहे.