Maharashtra Government Formation | अखेर ठरलं ! देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा शपथविधी आजच संध्याकाळी होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Government Formation | राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्याने सत्तांतराला वेग आला आहे. काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या (BJP) गोटात सत्ता स्थापनेसाठी हालचाली होत आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

दुपारीच एकनाथ शिंदे हे गोव्याहून थेट मुंबईत दाखल झाले असून ते फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहचले आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. हे दोघेही साडेतीन वाजता राजभवनावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपची आणि दुसरीकडे शिंदे गटाची बैठक पार पडली आहे. त्यानंतर आता शिंदेसह भाजपचे एक शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. त्यामुळं आज रात्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Government Formation)

 

दरम्यान, भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत शिक्कामोर्तब झाला आहे.
आज (गुरूवारी) राजभवनावर जाऊन देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकार बनवण्याचा दावा करतील.
या पार्श्वभूमीवर राजभवन परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याची माहिती आहे.

 

Web Title :- Maharashtra Government Formation | maharashtra government formation devendra fadnavis and eknath shinde will be take sworn today evening

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा