Maharashtra Government Job | सतत टीकेला सामोरे जाणाऱ्या महाराष्ट्र सरकारने उचलली रोजगार निर्मितीसाठी पावले; ‘या’ क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी करार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- अनेक प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या हातातून गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांची रोजगाराची संधी (Maharashtra Government Job) बुडत आहे. त्यामुळे विरोधक सरकारची सातत्याने टीका करत आहे. सरकार महाराष्ट्राचे असूनही काम मात्र गुजरातचं केलं जातंय, असा आरोप विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर करत आहे. आता विरोधकांच्या या आरोपाला सरकारने चाप बसवायचे ठरवले आहे. सरकारने पुढाकार घेऊन कौशल्य विकास विभागाबरोबर (Skill Development Department) सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्रात एक लाख नवीन रोजगार निर्माण (Maharashtra Government Job) केले जाणार आहेत.

राजभवनात पार पडलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी (Bhagatsingh Koshyari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि कौशल्य रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) उपस्थितीत होते. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Shinde Fadanvis Government) म्हणाले, ‘महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी असा निर्णय केला की आमच्या सरकारचे सर्वाधिक लक्ष हे रोजगार निर्मितीवर (Maharashtra Government Job) असले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील शासकीय रोजगारावरची अघोषित बंदी काढली आणि १० लाख रोजगार देण्याचा निर्णय केला. त्याअंतर्गत राज्य सरकारच्या वतीने 75 हजार बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचा निर्णय केला. त्याचसोबत खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे.’

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यातील 45 टक्के लोक रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहेत आणि शेती क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता नाही. त्यामुळे जोपर्यंत उत्पादन आणि सेवा क्षेत्रात नोकऱ्यांची संधी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत संपूर्ण युवाशक्तीच्या हाताला कोणीही काम देऊ शकत नाही. त्यासाठी नोकरीची संधी निर्माण करायची असेल, तर कौशल्य विकास हे महत्त्वाचं माध्यम ठरतं. आम्हाला प्रशिक्षित माणसं मिळत नाही, असं उद्योजक सांगतात. तर तरुण आमच्या हाताला काम नाही, असं म्हणत असतात. ही दरी संपवण्यासाठी कौशल्य विकास विभाग काम करतंय. वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन हाताला काम देण्याची जबाबदारी या विभागाने उचलली आहे.’ शेती क्षेत्राला सेवा, उत्पादन क्षेत्राशी जोडल्यानंतर शेतीवरील 20 टक्के भार कमी होईल, अशी अशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आम्ही करार करून विसरणारे लोकं नाही. करार झाल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करू,
काही अडचणी सोडवू, सातत्याने सरकार तुमच्या संपर्कात असेल. सर्वजण योग्यप्रकारे काम कराल याचा
विश्वास आहे. मंगलप्रभात लोढा यांनी या विभागाची जबाबदारी घेतल्यानंतर दरवर्षीपेक्षा तीन पट रोजगार
मेळावे घेतले जात आहेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या कार्यक्रमात राज्य सरकारने ४४ नामांकित उद्योजक, प्लेसमेंट एजन्सी, कौशल्य विकास विभागाचे
आयुक्त यांच्यासमावेत रोजगारासाठी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे राज्यातील १ लाखाहून
अधिक बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यात प्रामुख्याने हॉस्पिटॅलिटी, मीडिया अँन्ड एन्टरटेन्मेंट, बांधकाम, रिटेल, बँकिंग, एव्हिएशन या क्षेत्रात
दहावी पास-नापास, बारावी, पदवीधर, पदविकाधारक, फार्मसी, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग पदवी
या शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Web Title :-  Maharashtra Government Job | shinde fadnavis government will provide employment to 1 lakh youth skill department signed mou with companies

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra ST Strike | आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्र सरकारला घरचा आहेर; एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण

CM Eknath Shinde | दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया