Maharashtra Govt Job Vacant Seats | राज्यात तब्बल दोन लाख 44 हजार सरकारी पदे रिक्त; माहिती अधिकारातून आकडेवारी समोर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Govt Job Vacant Seats | राज्यात सरकारी विभागामध्ये अनेक पदे रिक्त (Maharashtra Govt Job Vacant Seats) असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील विविध सरकारी विभागात (Maharashtra State Government Departments) दोन लाख 44 हजार पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद (Zilla Parishad (ZP) आणि इतर विभागात ही सर्व पदे रिक्त आहेत. माहिती अधिकारातून Right To Information Act (RTI) ही बाब उघड झाली आहे.

 

माहिती अधिकाराच्या माध्यमातून आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ही आकडेवारी उघड झालीय. यात एका आरटीआय कार्यकर्त्याने विचारले होते की, महाराष्ट्र सरकारी नोकऱ्यांतर्गत किती पदांची भरती होऊ शकते आणि सध्या किती पदे रिक्त आहेत. त्यावेळी हा आकडा वर आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 29 शासकीय विभाग आणि जिल्हा परिषदेत एकूण 10 लाख 70 हजार 840 पदांवर नियुक्ती करण्यासाठी परवानगी आहे. त्यापैकी 8 लाख 26 हजार 435 पदे भरली असून 2 लाख 44 हजार 405 पदे रिक्त आहेत. (Maharashtra Govt Job Vacant Seats)

दरम्यान, खरंतर अनेक विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्री Chief Minister (CM) आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या अधिक असल्याचं देखील या अहवालात समोर आलंय. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांनी 11 मे रोजी सरकारच्या अंतर्गत सर्व श्रेणीतील पदांवरील मंजूर पदे आणि रिक्त पदांची माहितीसाठी अर्ज दाखल केला. याच्या उत्तरात प्रशासन विभागाकडून (Department of Administration) 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या रिक्त पदांचे तपशील जारी केले आहेत. यानुसार माहिती उघड झाली आहे.

 

गृह विभाग (Maharashtra Home Department) –

मंजूर पदे – 2 लाख 92 हजार 820
रिक्त पदे – 46 हजार 851

 

आरोग्य विभाग (Maharashtra Health Department) –

मंजूर पदे – 62 हजार 358
रिक्त पदे – 23 हजार 112

 

Web Title :- Maharashtra Govt Job Vacant Seats | maharashtra govt has total 2 lakh 44 thousands vacant posts in all departments as reported by rti

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा