Maharashtra Monsoon Weather Update | मान्सून लवकरच धडकणार; ‘या’ तारखेला महाराष्ट्रात बरसणार सरी? – IMD

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Weather Update | महाराष्ट्रासह देशात पावसाची (Maharashtra Rains) परिस्थिती निर्माण झाली आहे. गतवर्षीची तुलना करता यंदा मान्सून लवकरच (Maharashtra Monsoon Weather Update) अवतरणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार Indian Meteorological Department (IMD) यावर्षी मान्सूनचे लवकरच आगमन होणार असं सांगितलं. दरम्यान, नैऋत्य मान्सून (Southwest Monsoon) श्रीलंकेला (Sri Lanka) पोहोचला असून तो आता केरळ किनाऱ्याच्या (Kerala Coast) दिशेनं रवाना होत आहे. यामुळे आगामी 48 तासामध्ये मान्सूनचे वारे आणखी प्रगती करण्याची शक्यता आहे.

 

दक्षिण अरबी समुद्र (South Arabian Sea) आणि बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) मागील पाच दिवस मान्सून रखडला होता. आता त्याची हालचाल दिसू लागली आहे. मान्सूनने पुन्हा वेग पकडल्यामुळे आगामी काही तासांत मान्सूनचे वारे केरळमार्गे देशात प्रवेश करतील. अरबी समुद्राकडून येणारे वारे आगामी 48 तासांत दक्षिण अरबी समुद्र, कन्याकुमारीचा परिसर तसेच, संपूर्ण मालदीव आणि लक्षद्विपपर्यंतचा भाग व्यापतील अशी शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. (Maharashtra Monsoon Weather Update)

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सध्या मान्सूनच्या वाटचाली साठी वातावरण पोषक असल्याचं बोललं जात आहे.
केरळमध्ये मान्सूनचे आगमन काही तासातच सुरु होणार आहे. आता 1 जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सूनची सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.
तत्पूर्वी, नैऋत्य मान्सून 27 मे पर्यंत केरळच्या किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे.
तो पुढे जाण्याची अथवा 4 दिवसांनी उशीर होऊ शकतो. असे हवामान विभागानं सांगितलं आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Weather Update | arrival of monsoon in kerala likely imd said soon coming in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा