Maharashtra Gram Panchayat Election | महत्वाची बातमी : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या वेळेत वाढ

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची (Maharashtra Gram Panchayat Election) घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) ३ ऑक्टोबर २०२३ रोजी केली होती. यातील नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या वेळेत आता बदल करण्यात आला आहे. २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी ३ ऐवजी आता सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाढवली आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. (Maharashtra Gram Panchayat Election)

राज्य निवडणूक आयोगाने ०३ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत दाखल करण्याची मुदत होती. आता वेळेची ही मुदत वाढवली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकानुसार, नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीद्वारे भरले जात होते, मात्र त्याची प्रिंट काढतांना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या उर्वरित २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीतील मुदत सकाळी ११ ते दुपारी ३
ऐवजी आता सकाळी ११ ते सायंकाळी साडे पाच अशी करण्यात आली आहे.
अन्य प्रक्रिया पूर्व घोषित कार्यक्रमाप्रमाणे पार पडेल. मतदान ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी होईल. (Maharashtra Gram Panchayat Election)

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम

  • नामनिर्देशनपत्रे दाखल करणे :१६ ते २० ऑक्टोबर २०२३
  • नामनिर्देशनपत्रांची छाननी : २३ ऑक्टोबर २०२३
  • नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा दिनांक, चिन्ह वाटप : २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत.
  • मतदान : ५ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण, म्हणाले – ‘आरोपामागे भाजपचा हात, अजितदादांची ताकद…’