Maharashtra GST Department | महाराष्ट्र जीएसटी विभागाकडून पुण्यातील व्यापाऱ्याला अटक, 13.08 कोटींचा घोटाळा उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra GST Department | कोणतीही खरेदी विक्री न करता 72.68 कोटींची बनावट खरेदी (Fake Purchase) व विक्री बिल (Sales Bill) आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडीट (Fake Input Tax Credit) घेऊन टॅक्स क्रेडीट पास ऑन करणाऱ्या पुण्यातील में. शिव स्टील ट्रेडर्स (Shiv Steel Traders) या कंपनीवर महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अन्वेषण विभाग (Maharashtra GST Investigation Department) छापा मारला आहे. या प्रकरणात 13.08 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिटचा घोटाळा (Scam) उघडकीस आणला आहे. शासनाच्या महसूलाची हानी करणाऱ्या व्यापाऱ्याला विभागाने अटक (Arrest) केली आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अन्वेषण विभागाद्वारे (Maharashtra GST Department)  या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत अशाच प्रकारच्या 27 जणांना अटक कारवाया करण्यात आल्या आहेत.

 

मे शिव स्टील ट्रेडर्स या कंपनीचा मालक दौलत शिवलाल चौधरी (Daulat Shivlal Chaudhary) याला 13 जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करुन आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर (Maharashtra GST Department) चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा कसून शोध घेत आहे.

 

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अन्वेषण पथकाकडून बोगस बिलासंदर्भात विशेष तपासणी मोहीम सुरु असताना पथकाला पुण्यातील स्क्रॅप आणि स्टीलच्या मालाची विक्री करणाऱ्या मे. शिव स्टील ट्रेडर्स या कंपनीच्या व्यवहाराबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे जीएसटी अन्वेषण विभागाकडून या कंपनीच्या बोगस बिलासंदर्भात तसेच करचोरी (Tax Evasion) विरोधात विशेष कारवाई सुरु करण्यात आली होती. या तपासणीत या कंपनीने कोणत्याही वस्तूंचा प्रत्यक्षात व्यापार किंवा खरेदी विक्री केले नसल्याचे आढळून आले.दौलत शिवलाल चौधरी याला पुणे येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे.

ही कारवाई पुणे राज्यकर सह आयुक्त रेश्मा घाणेकर (Pune State Tax Joint Commissioner Reshma Ghanekar),
राज्यकर उपायुक्त (अन्वेषण) सुधीर चेके (Deputy State Tax Commissioner (Investigation) Sudhir Cheke),
अपर राज्यकर आयुक्त पुणे क्षेत्र (Addl State Tax Commissioner Pune Region)
धनंजय आखाडे (Dhananjay Akhade)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक राज्यकर आयुक्त हृषीकेश अहिवळे (Assistant Commissioner of State Taxes Hrishikesh Ahiwale),
चंदर कांबळे (Chander Kambl), प्रदीप कुलकर्णी (Pradeep Kulkarni), श्रीकांत खाडे (Shrikant Khade) व अन्वेषण विभागातील राज्यकर निरीक्षक यांनी केली.

 

Web Title :- Maharashtra GST Department | Pune businessman arrested by Maharashtra GST department, scam of 13.08 crores exposed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | राज ठाकरे-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंचा टोला; म्हणाल्या – एक आमदार असणार्‍याकडे 105 आमदार असणारा…

 

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा थेट इशारा; म्हणाले – ‘माझ्याकडे असे कलाकार, तुम्हाला कळणारही नाही…’

 

Soil Health Card | गावात राहून सरकारी मदतीने करा ‘हा’ बिझनेस, होईल शेतकर्‍यांची गर्दी, लाखोत होईल कमाई