आसाम नंतर महाराष्ट्रात NRC लागू ? मुंबईत तयारी सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यातील गृह विभागाने नवी मुंबई प्राधिकरणाला जमीन मागितली आहे. या जमिनीवर अवैधरित्या प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी एक केंद्र बनविले जाणार आहे. त्यामुळे आता आसामच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन म्हणजेच एनआरसी लागू होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नुकतेच आसाम सरकारने राज्यातील नागरिकांची एनआरसी यादी सादर केली असून यामध्ये जवळपास 19 लाख नागरिकांचा या यादीत समावेश नाही.

त्यामुळे आता महाराष्ट्रात जर एनआरसी कायदा लागू केला तर जास्त लोकसंख्या असलेल्या इतर राज्यात देखील हा कायदा लागू केला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र्राच्या सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला 2 ते 3 एकर जमीन मिळावी यासाठी पत्र आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समोर आलेल्या या माहितीने याला मोठ्या प्रमाणात राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर याआधी देखील मुंबईमध्ये मोठया प्रमाणात अवैध बांगलादेशी राहत असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता.

दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी देखील यावर बोलताना म्हटले होते कि, आसाममधील लोकांना त्यांचा अधिकार मिळावा म्हणून आम्ही या कायद्याचे समर्थन केले होते. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या बांग्लादेशींना देखील अशाचप्रकारे बाहेर काढण्यासाठी या कायद्याचा वापर व्हावा अशी आशादेखील त्यांनी व्यक्त केली होती.

आरोग्यविषयक वृत्त –