Maharashtra IAS Transfer | राज्यातील 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, दीपक सिंगला यांची पुणे PMRDA च्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra IAS Transfer | राज्य सरकारने शुक्रवारी (दि.30) भारतीय प्रशासकीय सेवेतील (Maharashtra IAS Transfer) 6 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये दीपक सिंगला यांची पुणे PMRDA च्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर राजेश पाटील यांची संचालक, सैनिक कल्याण पुणे येथून नवी मुंबई सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती (IAS Transfer) करण्यात आली आहे.

 

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि त्यापुढे कोठून कोठे बदली झाली. (Maharashtra IAS Transfer)

1. राजेश पाटील (Rajesh Patil) – संचालक, सैनिक कल्याण, पुणे यांची सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको (CIDCO), नवी मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

 

2. अश्विन ए. मुद्गल (Ashwin A. Mudgal) – सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई यांची महानगर आयुक्त, एमएमआरडीए, मुंबई येथे नियुक्ती केली आहे.

 

3. अजय अण्णासाहेब गुल्हाने (Ajay Annasaheb Gulhane) – नागपूर स्मार्ट सिटी, सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नागपूर आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका (Municipal Commissioner, Nagpur) यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

 

4. दीपक सिंगला (Deepak Singla) – यांची अतिरिक्त आयुक्त, PMRDA पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

5. भाग्यश्री बानायत (Bhagyashree Banayat ) – यांची नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

6. डॉ. इंदुरानी जाखर (Dr.Indurani Jakhar) – यांची MAVIM च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Web Title :- Maharashtra IAS Transfer | Transfer of 6 IAS officers in the state, appointment of Deepak Singla as Additional Commissioner, Pune PMRDA

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Eknath Shinde | उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध एकनाथ शिंदेंची टोलेबाजी, अधिवेशन समारोपदिनी मुख्यमंत्र्यांची चौफेर फटकेबाजी (व्हिडिओ)

Pune PMC News | पुणे मनपा अभियंता संघाच्या 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री खोटे बोलले, वीज तोडल्या प्रकरणी शेतकऱ्याची थेट फडणवीसांविरुद्ध पोलिसांत तक्रार