Maharashtra IPS Transfer | अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची राज्य कारागृह प्रमुख पदी नियुक्ती, तर पिंपरी चिंचवड सह पोलीस आयुक्त पदी लोहीया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra IPS Transfer | राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्र पोलीस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या मंगळवारी (दि.13) बदल्या केल्या होत्या. यामध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेल्या पदस्थापनेमध्ये आज बदल (Maharashtra IPS Transfer) करण्यात आला आहे. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची अपर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, मुंबई येथे बदली करण्यात आली होती. आता त्यांची बदली राज्य कारागृह अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, पुणे येथे नेमणूक केली आहे. तर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीषक मनोज लोहिया यांची पिंपरी चिंचवड येथे सह पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.

 

महाराष्ट्र पोलीस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Maharashtra IPS Transfer) आदेश आज (शनिवार) शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार काढले आहेत.

 

बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे पूर्वीच्या पदस्थापनेचे ठिकाण आणि त्यापुढे नव्याने पदस्थापना करण्यात आलेले ठिकाण

1. अमिताभ गुप्ता Amitabh Gupta (अपर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, मुंबई (Addl DGP, Law and Order) ते अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणेAddl DGP and IG Prisons and Correctional Services)
2. रंजन कुमार शर्मा Ranjan Kumar Sharma (अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई ते अपर पोलीस आयुक्त (पूर्व) पुणे शहर Addl CP Pune City)
3. सुनिल फुलारी Sunil Phulari (विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक ते विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर)
4. संजय मोहिते Sanjay Mohite (विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे कार्य़ालय, मुंबई ते पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई)
5. सुरेशकुमार मेंडगे Suresh Kumar Mendge (पोलीस उपायुक्त मीरा-भाईंदर-वसई-विरार ते मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, नवी मुंबई)

 

बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव कंसात कोठून कोठे

1. मनोज लोहिया Manoj Lohia (विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र (Special Inspector General
of Police, Kolhapur Zone), कोल्हूपर ते पोलीस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड Joint CP, Pimpri)
2. सुहास वारके Suhas Warke (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था,
पोलीस महासंचालक यांचे कार्यालय, मुंबई- Special Inspector General of Police, Law and Order)
3. संजय दराडे Sanjay Darade (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई – Addl CP, Special Branch, Brihanmumbai)
4 . रविंद्र शिसवे Ravindra Shisve (विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई ते पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई)

 

Web Title :- Maharashtra IPS Transfer | Additional Director General of Police Amitabh Gupta
has been appointed as State Revenue Chief, while Lohia has been appointed as
Joint Commissioner of Police, Pimpri Chinchwad.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा