Maharashtra Local Body Election | ‘तारीख पे तारीख’, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

Maharashtra Local Body Election | supreme court hearing on maharashtra local body election postponed to tuesday
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील (Maharashtra Local Body Election) सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. आता पुढील सुनावणी 28 मार्च रोजी होणार आहे. स्थानक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी सुनावणी पुढच्या मंगळवारी होणार आहे. ऑगस्ट 2022 पासून ही सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Maharashtra Local Body Election) मार्ग कधी मोकळा होणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे
.
सुप्रीम कोर्टात (Supreme Court) या प्रकरणात मागील चार महिन्यांपासून तारीख पे तारीख सुरु आहे. आज पुन्हा नवीन तारीख मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी (Maharashtra Local Body Election) आज सुनावणी झाली. 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी (Municipal Council Elections) केवळ आदेश देणे बाकी असल्याचे वकिलांनी सांगितले. कोणताही मुद्दा प्रलंबीत नाही तुम्ही एक तर आधीच्या अथवा आत्ताच्या पद्धतीनुसार निवडणूक आयोगाला (Election Commission) निर्णय घ्यायला सांगायचं असल्याचे वकिलांनी सांगितले.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टात अडकल्यात दोन कारणांमुळे एक म्हणजे ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) ग्रीन सिग्नल मिळाला. मात्र आधी जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांमध्येही हे आरक्षण मिळावं यासाठी शिंदे सरकार (Shinde Government) न्यायालयात गेलं. तसेच महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळातील वॉर्डरचना 4 ऑगस्ट रोजी एका अध्यादेशानं या सरकारनं बदलली. 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने जैसे थे आदेश दिला, त्यानंतर आजपर्यंत या प्रकरणांवर सुनावणी झालेली नाही.

निवडणुका कधी होणार?

महाविकास आघाडीने तयार केलेली वॉर्ड रचना सुप्रीम कोर्टाने मान्य केली तर निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
मात्र 23 महानगरपालिका, 207 नगपालिका, 25 जिल्हा परिषद आणि 284 पंचायत समिती अशा सर्व निवडणुका घ्यायच्या आहेत.
यामुळे निवडणूक आयोग दोन टप्प्यात निवडणुका घेऊ शकतं. काही निवडणुका पासाळ्यापूर्वी तर काही पावसाळ्यानंतर निवडणुका होऊ शकतात.

जर शिंदे सरकारची वॉर्ड रचना न्यायालयाने मान्य केली तर नव्याने प्रक्रिया राबवण्यासाठी निवडणूक आयोगाला
काही वेळ लागू शकतो. त्यामुळे या सर्व निवडणुका पावसाळा झाल्यानंतर होण्याची शक्यता आहे.
मुंबई-पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका (Mumbai-Pune Municipal Corporation Elections)
ऑक्टोबरपर्यंत जाऊ शकतात.

Web Title :-  Maharashtra Local Body Election | supreme court hearing on maharashtra local body election postponed to tuesday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | भाजी विक्रेत्यांवर अतिक्रमण कारवाई करणाऱ्यांना बांबुने मारहाण; वारजेमधील घटना, दोघे जखमी

Nashik Crime News | अज्ञात महिलेने घरात घुसून आईला बेशुद्ध करून 3 महिन्यांच्या मुलीची केली हत्या, नाशिकमधील घटना

Symptoms Of Stress | तणाव घेतल्याने वाढतो ‘या’ 2 गंभीर आजारांचा धोका; जाणून घ्या

The Dark Shadow Motion Pictures | समर क्वीन, किंग, प्रिन्स, प्रिन्सेस सौंदर्य स्पर्धेचे आयोजन; विजय पाटकर, जयवंत वाडकर, स्मिता गोंदकर, गायक उत्कर्ष शिंदे असे अनेक दिग्गज लावणार हजेरी

Total
0
Shares
Related Posts