Maharashtra Monsoon Update | आगामी चार दिवस पुण्यासह, कोकणात जोरदार पावसाची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | मागील काही दिवस पाऊस गायब झाला होता. नंतर पुन्हा पावसाचं (Maharashtra Monsoon Update) पुनरागमन झालं. तेव्हापासून राज्यातील काही जिल्ह्यात पावसानं जोर धरला आहे. राज्यात सर्वत्र पावसाची (Monsoon) रिपरिप दिसत असतानाच. आज आज पुण्यासह (Pune) संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं (Meteorological Department) वर्तवली आहे. आज रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red alert) दिला आहे. तसेच, पुणे, पालघर, ठाणे, मुंबई, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange alert) दिला गेला आहे. म्हणून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील (Rain in Maharashtra) काही भाग सोडता आज राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस (Rain) होण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, राज्यात आगामी 4 दिवस अशीच परिस्थिती कायम असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे.

Maharashtra Mansoon Update | weather update heavy rainfall alert in pune for next 4 days and very heavy rains in konkan

काल रविवारी दिवसभर रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), सांगली (Sangli)
आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पावसाने झोडपलं आहे. तसेच,
धुळे, सातारा, सोलापूर, नांदेड, परभणी आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत सुद्धा जोरदार पाऊस
बरसला आहे. तर आज पुन्हा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची (Heavy Rain)
शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. अशीच स्थिती आगामी 5 दिवस राज्यात
कायम राहणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, आज सकाळपासूनच पुण्यासह (Pune) ठाणे, मुंबई आणि उपनगरात ढगाळ हवामानाची नोंद झालं;इ आहे. तर आज दिवसभर मुबंईत अनेक भागात पावसाला रिमझिम सुरु होती. तसेच रात्रीच्या दरम्यान मुंबईत पावसाची (Monsoon) गती वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या 6 तासामध्ये दक्षिण मुंबई, पूर्व उपनगरात आणि बोरीवली ठिकाणी पावसाने दमदार धुमाकूळ घातला आहे. तसेच, अन्य भागात मात्र पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या . तर आज विदर्भात जवळपास सर्वत्र भागामध्ये कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. म्हणून विदर्भात आज पावसाची शक्यता खूपच कमी आहे. परंतु काही भागात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली (Meteorological Department) आहे.

हे देखील वाचा

NCP | आधी व्यवस्थेची माहिती करुन घ्या, पटोलेंच्या पाळत ठेवण्याच्या विधानावर राष्ट्रवादी संतापली (व्हिडिओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Maharashtra Mansoon Update | weather update heavy rainfall alert in pune for next 4 days and very heavy rains in konkan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update