Maharashtra Monsoon Session | ‘अजित पवार निर्मळ मनाचे, त्या मनाचा…’, निधीवाटपावरुन नाना पटोलेंचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Session | राज्याच्या पावसाळी अधिवेशनात निधी वाटपावरुन (Fund Allocation) सध्या चांगलाच कलगीतुरा रांगल्याचे दिसत आहेत. सत्ताधारी आमदारांना (MLA) जास्तीचा निधी वाटप करताना विरोधी पक्षाच्या आमदारांना डावलण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पुरवणी मागण्यांच्या निमित्ताने आज विधानसभेत (Maharashtra Monsoon Session) विरोधकांनी राज्य सरकार (State Government) आणि विशेषत: अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधाल आहे. विरोधकांनी केलेल्या आरोपांना अजित पवार यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे त्यांनी आपलं उत्तर आटोपतं घेतल. यानंतर काँग्रेस आमदार नाना पटोले (Congress MLA Nana Patole) यांनी अजित पवारांना खोचक शब्दात टोला लगावला आहे.

काय म्हणाले अजित पवार?

निधीवाटपात भेदभाव केल्याचा आरोप विरोधकांनी (Maharashtra Monsoon Session) केल्यानंतर त्यावर अजित पवारांनी संध्याकाळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. 41 हजार कोटी रुपये पुरवणी मागण्या कशा झाल्या वगैरे प्रश्न सदस्यांना पडले. मात्र, त्यामागचं कारणही सभागृहानं समजून घेतलं पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं. परंतु यामुळे विरोधकांचे समाधान न झाल्याने त्यांनी गोंधळ घातला. याच गोंधळात पवारांनी पुरवणी मागण्या विधेयक सभागृहासमोर मांडलं.

काय म्हणाले नाना पटोले?

अजित पवार यांनी दिलेल्या उत्तरावर बोलताना नाना पटोले म्हणाले,
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government)
अजित पवारच उपमुख्यमंत्री होते.
खरंतर मुख्यमंत्र्यांना अजित पवारांनी जो त्रास दिला होता,
त्या पद्धतीचा त्रास त्यांना द्यायला पाहिजे होता. आमचा काय दोष आहे त्यात?
तुम्ही तसा त्रास देत होतात असं शिंदे गटाचे आमदार (Shinde Group MLA) सांगत होते. म्हणून मी त्याचा उल्लेख करतोय. आम्हा लोकांच्या मतदारसंघात निधी दिला गेला नाही.

अजित पवार फार निर्मळ मनाचे आहेत. त्या निर्मळ मनाचा वापर झाला पाहिजे.
आमच्या सगळ्या आमदारांच्या मतदारसंघात 25-25 कोटी रुपये देऊन टाकले,
तर वादच संपतो, अशी मिश्किल टिप्पणी नाना पटोले यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Terrorists Arrested in Pune | पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून पुणे,
सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी, ATS ची माहिती