Maharashtra NCP Crisis | लवकरच शिंदेंची सुट्टी, अजित पवारांचे डील मुख्यमंत्री पदासाठी; राज्यातील बड्या नेत्यांचे दावे खरे ठरणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra NCP Crisis | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या (BJP) साथीने रविवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ (Deputy Chief Minister Oath) घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या अत्यंतजवळचे मानले जाणाऱ्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप (Maharashtra NCP Crisis) झाला आहे. मात्र अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्यानंतर अजित पवारांच्या भूमिकेबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशातच राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाजपनं टाकलेल्या या डावावर मोठे दावे केले आहेत.

अजित पवार मुख्यमंत्री होणार

अजित पवार उपमुख्यमंत्रीपदासाठी भाजपसोबत गेलेले नाही तर त्यांचे डील हे मुख्यमंत्रपदासाठी झाल्याचा दावा अनेक बड्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics News) पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. एका वृत्तवाहिनीने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, लवकरच अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. सगळं जुळून आल्यास जुलैमध्येच अजित पवार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात आणखी काही नाट्यमय घडामोडी बघायला मिळण्याची शक्यता आहे.

शिंदेंची ताकद कमी होईल – जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले की, या घटनाक्रमामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ताकद कमी होईल. तसेच आता त्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी अजित पवार यांना आधीच बहुमत असलेल्या सरकारमध्ये समाविष्ट करुन घेतलं असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाय – पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, जाहीरपणे बोललो होतो, पण त्यामुळे अडचणीत आलो. काही महिन्यांपासून वाटाघाटी चालू होत्या. असे घडत आहे, हे माहिती होते. अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाचा शब्द असल्याची आमची माहिती आहे. एकनाथ शिंदेंना बाजूला करुन किंवा अध्यक्षांकडून त्यांच्या विरोधात निकाल देऊन अजित पवारांना मुख्यमंत्री पद दिले जाऊ शकते.

राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार – संजय राऊत

अजित पवार यांची भाजपसोबत मुख्यमंत्री पदाची डील झाल्याचा दावा ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्याकडून वारंवार केला जात आहे. अजित पवारांच्या शपथविधीनंतर राऊतांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) निशाणा साधत एकनाथ शिंदेंसह 16 आमदार लवकरच अपात्र होणार आहेत, त्यामुळेच राजकारणात ट्विस्ट आला आहे. त्यानंतर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार असल्याचं भाकीत राऊतांनी केलं होतं. तसेच, भाजप आणि अजित पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठीच करार झाला असून सध्याचे मुख्यमंत्री लवकरच घरी जातील, असा पुनरुच्चार राऊत यांनी आज केला.

भाजपनं शिंदेंना पर्याय तयार केलाय

अजित पवारांच्या सोबत येण्यानं एनडीए (NDA) तर मजबूत होईलच, शिवाय भाजपला भागीदार म्हणून शिंदे यांना पर्याय उपलब्ध होईल. अशा परिस्थितीत भाजप आता शिंदेंचा पत्ता कट करु शकते, अशी चर्चा होत आहे.

Web Title : Maharashtra NCP Crisis | ncp political crisis ajit pawar is the new chief minister of maharashtra will the claims of big political leaders be true know details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा