Pune News | मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा ई-मेल करणार्‍यास घेतले पुण्यातून ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुलाला शाळेत अ‍ॅडिमिशन (Admission) मिळाले नाही, म्हणून गृहविभागाला मंत्रालयात (Ministry of Home Affairs) बॉम्ब (Bomb)  ठेवल्याचा धमकीचा ई मेल (E-mail) करणार्‍यास पुण्यात ताब्यात घेण्यात आले आहे. शैलेश शिंदे (रा. घोरपडी) याला मुंढवा पोलिसां (Mundwa Police) नी ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या हवाली केले आहे. Ministry of Home Affairs | One arrested for sending fake threats via email to bomb Mumbai Mantralaya. He has been detained from Pune’s Ghorpadi area and will be handed over to Mumbai police.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा ई मेल सोमवारी सायंकाळी गृह मंत्रालयाला मिळाला. त्यांनी सायंकाळी ६ वाजता याची माहिती मंत्रालयातील सुरक्षा विभागा ( Security Department) ला दिली. त्यानुसार मुंबई पोलिसांनी तातडीने बॉम्बनाशक आणि शोधक पथक मंत्रालय परिसरात पोहचले. त्यांनी सर्व परिसर पिंजून काढला. दरम्यान, दुसरीकडे हा ई मेल कोणाकडून आला याचा शोध सुरु झाला. तो पुण्यातील शैलेश शिंदे याने केल्याची माहिती मिळाली.

मुंबई पोलिसांनी तातडीने ही माहिती पुणे पोलिसांना दिली. मुंढवा पोलिसांनी घोरपडी येथून शैलेश याला लगेजच ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशीत मुलाला शाळेत अ‍ॅडमिशन मिळाले नाही, या रागातून त्याने ई मेल केल्याचे सांगितले. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी शैलेश शिंदे याला ताब्यात घेतले आहे.

गेल्या महिन्यात ३० मे रोजीही मंत्रालयात फोन करुन एकाने बॉम्ब ठेवल्याचे सांगितले होते. त्यावरुन नागपूरमधील सागर मंदेरे याला तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. तो मनोरुग्ण असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Ministry of Home Affairs| One arrested for sending fake threats via email to bomb Mumbai Mantralaya. He has been detained from Pune’s Ghorpadi area and will be handed over to Mumbai police.

हे देखील वाचा

Rain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती

Pimpri Chinchwad News | भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक, पिस्तूलासह 4 काडतुसे हस्तगत

Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?

Pune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची फसवणूक; बापलेकांना लोणी काळभोर पोलिसांनी पाकिस्तान सीमेवरून केले अटक