छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक सीआयडी येथे पोलिस अधीक्षक असलेले आणि पूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्त राहिलेल्या पोलीस अधिकाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत शुक्रवारी (दि.19) तिघांच्या अंगावर एसयूव्ही गाडी (एमएच 15 एचएम 9952) घातली. यामध्ये कुलगुरुंच्या बंगल्याचा सुरक्षा रक्षक आणि बुलढाण्यावरुन पर्यटनासाठी आलेल्या दोघांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच या पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याने मागील दीड महिन्यात तीन वेळा अशा प्रकराचा अपघात केला आहे. (Maharashtra Police News)
दिपक गिऱ्हे असे या पोलीस उपायुक्तांचे नाव आहे. गिऱ्हे हे पूर्वी संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त होते. त्यानंतर त्यांची मुदतपूर्व नाशिक सीआयडीमध्ये पोलीस अधीक्षक पदावर बदली करण्यात आली. गिऱ्हे शहराकडे निघाले असताना हा अपघात झाला. त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या रस्त्यात कोसळल्याने लोकांनी एकच गर्दी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गोगाबाबा टेकडी जवळ हा अपघात झाला आहे. दीपक गिऱ्हे हे गोगाबाबा टेकडी वरून खाली येत होते. त्यावेळी त्यांच्या कारने दोन जणांना धक्का दिला. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले. तरुणांनी गिऱ्हे यांच्या गाडीचा पाठलाग करत कारवर दगडफेक केल्याने नशेत तर्र असलेल्या उपायुक्तांची गाडी थेट खड्ड्यात गेली. सोशल मीडियावर तरुणांना विनवण्या करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.
जाऊ द्या ना प्लीज…
कार खड्ड्यात जाताच तरुणांनी दीपक गिऱ्हे यांना घेरले. जमाव जमत असल्याने त्यांनी ओळख दाखवत मित्रांनो मला दोन मुली आहेत. सॉरी बाबा… मला असं अपमानीत करु नका… प्लीज यांना जायला सांगा… अशा विनवण्या करताना व्हिडिओत दिसत आहे.
दीड महिन्यात तिसऱ्यांदा अपघात
दीपक गिऱ्हे हा अधिकारी सध्या नाशिक शहरात कार्यरत आहे. दारुच्या नशेत असल्याचे व्हिडिओतून दिसत आहे. विशेष म्हणजे, दीपक गिऱ्हे यांनी मागील दीड महिन्यात तीन वेळा शहरात अपघात केला होता. त्यामुळे कालच्या घटनेमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या प्रकरणी अद्याप पोलिसांकडे कोणी तक्रार दाखल केली नाही. मात्र, एका मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडून अशा प्रकारचे अपघात वारंवार होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
घरात घुसून दमदाटी करुन मारहाण, मेहुण्यासह चार जणांवर FIR; वाकड परिसरातील घटना