Pune Pimpri Chinchwad Crime News | घरात घुसून दमदाटी करुन मारहाण, मेहुण्यासह चार जणांवर FIR; वाकड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – जबरदस्तीने घरात घुसून दमदाटी करत मारहाण केल्याप्रकरणी पत्नीच्या भावासह चार जणांवर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.17) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमरास वाकड येथील सोनिस्टा आपार्टमेंटमध्ये घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत अतुल सुधाकर बंड (वय-33 रा. सोनिस्टा आपार्टमेंट, वाकड मुळ रा. मु.पो. सस्ती ता. पातुर जि. अकोला) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन मयूर मोतीराम इंगळे (रा. पारस ता. बळापुर) याच्यासह इतर तीन जणांवर आयपीसी 452, 323, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पत्नी घरी आल्याने फिर्यादी यांनी तीला घरात घेऊन दरवाजा बंद करत होते. त्यावेळी फिर्यादी यांचा मेहुणा आरोपी मयुर इंगळे हा त्याच्या इतर तीन साथीदारांसह आला. त्याने दरवाजा जोरात उघडून जबरदस्तीने घरात प्रवेश केला. त्यावेळी अतुल बंड यांनी तु माझ्या घरात का आला, तुझा काय संबंध अशी विचारणा केली. त्यावेळी मयुर याने फिर्यादी यांना तुझं लय नाटक झालं आहे,

तु माझ्या बहिणीला खुप त्रास दिला आहे, तुला बघतोच असे म्हणून धमकी दिली. तसेच मयुर व त्याच्या इतर तीन साथीदारांनी अतुल यांना बेदम मारहाण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर ‘राम नाम जप’, ‘समृद्धी’वरील मृतांच्या कुटुंबियांचे २५ लाखांच्या मदतीसाठी आंदोलन

Pune Accident News | भरधाव क्रेनच्या धडकेत युवकाचा मृत्यू, चिखली परिसरातील घटना