Maharashtra Police News | महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-2023 मधील उप स्पर्धांचा निकाल जाहीर

पुणे गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस निरीक्षक सीमा गायकवाड यांना सुवर्ण तर सहायक पोलीस निरीक्षक ज्योती मेढे यांनी रजत पदक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | पोलिसांच्या व्यावसायिक कौशल्याला वाव देण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (Criminal Investigation Department (CID) महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-2023 चे (Maharashtra State Police Duty Meet-2023) आयोजन करण्यात आले आहे. रामटेकडी येथील राज्य पोलीस दलाच्या मैदानावर (State Police Force) हा मेळावा पार पडत आहे. मेळाव्यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. (Maharashtra Police News)

18 वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा- 2023 ची सुरुवात सोमवार (दि.4) पासून झाली असून याचे औपचारीक उद्घाटन मंगळवारी (दि.5) सायंकाळी साडेचार वाजता राज्य राखीव पोलीस बल गट क्र.2 च्या परेड मैदानावर होणार आहे. कर्तव्य मेळाव्यामध्ये पार पडलेल्या स्पर्धांमधील उप स्पर्धकांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या स्पर्धा पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी व निष्णात डॉक्टर, वकील, तंत्रज्ञ व पंच यांना नेमण्यात आले आहेत. स्पर्धेमधील उप स्पर्धांचे पर्यवेक्षन वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत आहेत. (Maharashtra Police News)

उप स्पर्धांचे निकाल खालील प्रमाणे

  1. पोलीस फोटोग्राफी स्पर्धा (Police Photography Competition)
  • सुवर्ण पदक (Gold Medal) – विजय कदम Vijay Kadam (पोलीस शिपाई, मुंबई शहर-Police Constable, Mumbai City)
  • रजत पदक (Silver Medal) – सुहास देशमुख Suhas Deshmukh (पोलीस शिपाई, मुंबई शहर)
  • कास्य पदक (Bronze Medal) – रौनक फुले Raunak Phule (पोलीस शिपाई, नागपूर शहर-Nagpur City)

  1. Scientific Aid to Investigation अंतर्गत Fingerprint Test

  • सुवर्ण पदक – सीमा गायकवाड Seema Gaikwad (पोलीस निरीक्षक, गु.अ.वि., पुणे PI, CID Pune)
  • रजत पदक – ज्योती मेढे Jyoti Medhe (सहायक पोलीस निरीक्षक, पुणे शहर API, Pune City)
  • कास्य पदक – मयुरी पवार Mayuri Pawar (पोलीस उप निरीक्षक, एटीएस PSI ATS)

विजेत्या स्पर्धकांचा सत्कार गुन्हे अन्वेषण विभाग पुणे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे (Addl DGP Prashant Burde) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गुन्हे अन्वेषण विभाग पुणे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ (Dr. Dilip Patil-Bhujbal), गुन्हे अन्वेषण विभाग पुणे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनुपरे (Sanjay Yenupare), पोलीस उप महानिरीक्षक नामदेव चव्हाण (Namdev Chavan), पोलीस उप महानिरीक्षक सारंग आवाड (Sarang Awad) यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MLA Rohit Pawar | प्रफुल्ल पटेलांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या दाव्यावर रोहित पवारांचे जोरदार प्रतिउत्तर; “आमच्याकडे शरद पवार…”

Pune Crime News | 50 लाखांची खंडणी मागणारा सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेकडून गजाआड