Maharashtra Police News | ऑनलाईन गेमिंगमुळे पोलीस कर्मचारी बनला कर्जबाजारी, कर्ज फेडण्यासाठी लुटमारी करताना गोळीबार; एकाचा मृत्यू तर एक जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | पोलीस दलात कार्यरत असताना ऑनलाईन गेमिंगचं वेड पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलचं लागलं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस कर्मचाऱ्याला ऑनलाईन गेमिंगमध्ये बक्षीस मिळाल्याने निलंबित व्हावे लागले. तर मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला गुन्हेगार बनवले. ड्रीम 11 आणि क्रिकबज सारख्या ऑनलाइन गेमिंगमुळे पोलीस कर्मचारी 62 लाखांच्या कर्जात बुडाला. हेच कर्ज फेडण्यासाठी तो गुन्हेगार बनला. लुटमारी करत असताना त्याने केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पोलीस हवालदार सूरज देवराम ढोकरे (वय-37) याला अटक केली आहे. ढोकरे हा मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. (Maharashtra Police News)

सूरज ढोकरे याने केलेल्या गोळीबारात अजीम अस्लम सय्यद (वय-30) याचा मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र फिरोज रफिक शेख (वय-27) हा गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी (दि.13) भिवंडी तालुक्यातील अंबाडी-वाशिंद रोडवरील पाईपलाईन जवळ मैदे गावच्या हद्दीत दुचाकीवरुन विरार पूर्व मधील चंदनसार येथे राहणारे दोन मित्र नातेवाईकांकडे जात होते. त्यावेळी लुटमारीच्या उद्देशाने आरोपी सूरज ढोकरे अंबाडी गावच्या हद्दीत येणाऱ्या-जाणाऱ्यांवर पाळत ठेवून होता. (Maharashtra Police News)

दुचाकीवरुन जात असलेल्या फिरोज आणि मृत अजीम यांच्या अंगावर दागिने पाहून आरोपी हवालदाराने त्यांचा पाठलाग केला. एका निर्जन स्थळी त्यांना आडवले. त्यांना धमकी देऊन त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेत असताना अजीमने झटापट केली. त्यामुळे हवालदार सूरज याने त्याच्याकडे असलेल्या सर्व्हिस रव्हॉल्व्हरने दोघांवर गोळीबार करत सहा राऊंड फायर केले. यामध्ये दोघेही गंभीर झाल्याचे पाहून त्याने दुचाकीवरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकी खराब झाल्याने त्याने दुचाकी घटनास्थळी सोडून पळून गेला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पडघा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पडघा पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता हल्लेखोर नगर-नाशिक बसने पळून जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे नगर पोलिसांच्या मदतीने बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका संशयिताला शस्त्रासह शिर्डीतून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता तो मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी गेल्या आठ दिवसांपासून आरोपी हवालदार सूरज ढोकरे याच्याकडे चौकशी केली.
त्याने सांगितले की, ऑनलाईन गेमिंगच्या नादात विविध बँक आणि पतपेढ्यांमधून 62 लाखांचे कर्ज घेतले आहे.
हेच कर्ज फेडण्यासाठी त्याने चोरी व दरोड्याचा मार्ग निवडला.

दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्या अजीमचा 16 ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यामुळे पडघा पोलिसांनी पोलीस हवालदार सूरज याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.
अटक केलेल्या आरोपीने यापूर्वीही अंबाडी भागात येऊन ग्रामीण भागातील नागरिकांना धमकी देऊन हजारो रुपये
घेऊन त्यातून कर्ज फेडल्याचे समोर आले आहे. मात्र, लुटमारी करताना केलेल्या गोळीबारात एका निष्पाप तरुणाला
आपला जीव गमवावा लागला आहे. तर याआधीही आरोपीकडून अशाच प्रकारची घटना घडली आहे का आणखी काही
गुन्हे घडले आहेत का? याचा तपास पडघा पोलीस करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी
सोमवारी (दि.23) भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Water Supply News | पुण्यातील काही भागाचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद

MCA Joins Hands With Punit Balan Group | एमसीएचा महाराष्ट्रातील क्रिकेट विकासाला चालना देण्यासाठी पुनित बालन ग्रुपसोबत करार