Maharashtra Police News | कोर्टात पोहोचण्यास उशीर, दोन पोलिसांना गवत कापण्याची शिक्षा

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | सुट्टीकालीन कोर्टात 30 मिनिटे उशिरा पोहचल्याने परभणी जिल्ह्यातील मानवत पोलीस ठाण्यातील (Manawat Police Station) हवालदार व हेड कॉन्स्टेबल यांच्यावर शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे. या दोघांना जन्मभर लक्षात राहणारी शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. दोघांनाही कोर्ट परिसरातील गवत छाटण्याचे काम देण्यात आले होते. (Maharashtra Police News)

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन पोलीस कर्मचारी रविवार 22 ऑक्टोबर रोजी रात्र गस्तीवर होते. त्या दोघांना पहाटे मानवत येथे दोन जण संशयास्पद रित्या फिरताना दिसल्याने त्यांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेल्या दोघांना सकाळी 11 वाजता सुट्टीकालीन न्यायालयासमोर हजर केले जाणार होते. मात्र संशयितासह पोलीस सकाळी साडेअकरा वाजता न्यायालयात पोहोचले. त्यामुळे त्यांनी न्यायदंडाधिकारी यांचा रोष ओढवून घेतला. न्यायालयात 30 मिनीटे उशिरा आल्याने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना गवत कापण्याचे आदेश दिले.

या असामान्य शिक्षेमुळे अस्वस्थ झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने ही बाब त्याच्या वरिष्ठांना कळवली. त्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन डायरीत याची अधिकृतपणे नोंद करण्यात आली. तसेच याचा तपशीलवार अहवाल विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला. (Maharashtra Police News)

परभणीचे प्रभारी पोलीस अधिकारी यशवंत काळे यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. हे आमच्या निदर्शनास आणून
दिल्यानंतर, हवालदारांच्या जबाबसह सविस्तर अहवाल योग्य कारवाईसाठी न्यायालयाकडे पाठवला होता.
या घटनेतील साक्षीदार असलेल्या इतर तीन हवालदार यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार (PI Deepak Dantulwar)
यांनी स्टेशन डायरी नोंदीला दुजोरा दिला आहे. परंतु, अधिक तपशील देण्यास नकार दिला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

गाडीतून कचऱ्याच्या पिशव्या आणून थेट समुद्रात टाकल्या, व्हिडिओ पाहिल्यावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई