Mumbai Police | गाडीतून कचऱ्याच्या पिशव्या आणून थेट समुद्रात टाकल्या, व्हिडिओ पाहिल्यावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई : Mumbai Police | पाच-सहा लोकांनी गाडीतून येऊन गेट ऑफ इंडिया (Gate of India) जवळच्या समुद्रात मोठमोठ्या कचऱ्याच्या बॅगा रिकाम्या केल्या. हा कचरा समुद्रात (Dumping Trash In Sea) मोठ्या प्रमाणात पसरला. हा प्रकार एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद करून व्हिडिओ सोशल मीडियावरून मुंबई पोलिसांना (Mumbai Police) पाठवला. यावर उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही कमेंट करत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, प्रकरणाची तातडीने दखल घेत पोलिसांनी कचरा टकणाऱ्यांना शोधून काढले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

हा व्हिडिओ मुंबई पोलिसांच्या एक्स हॅण्डलवर मंगळवारी पाठविण्यात आला. ताज हॉटेलसमोर गेट-वे ऑफ इंडियाच्या बाजूला किनाऱ्यावरून काहीजण समुद्रात कचरा टाकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. टॅक्सीत ठेवलेल्या कचऱ्याच्या प्लास्टिकच्या पिशव्या चार ते पाच जण एक एक करून समुद्रात टाकत असल्याचे दिसत आहे.

व्हिडिओ तयार करणाऱ्याने मजकुरात म्हटले आहे की, या कचऱ्यामुळे समुद्राचे पाणी प्रदूषित (Mumbai Pollution) होत आहे. पोलिसांनी (Mumbai Police) या व्हिडीओची दखल घेत कचरा टाकणाऱ्यांचा तातडीने शोध घेतला. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या टॅक्सीच्या क्रमांकावरून पोलिसांनी टॅक्सीचालकाला शोधले.

मोहम्मद याकूब अहमद दूधवाला असे या टॅक्सीचालकाचे नाव आहे.
त्याच्यासह इतरांविरुद्ध कुलाबा पोलिस ठाण्यात (Colaba Police Station)
सार्वजनिक मालमत्ता नुकसानप्रतिबंध अधिनियम आणि भादंविच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई महापालिकेनेही (Mumbai Municipal Corporation) या प्रकाराची दखल घेतली.
मुंबई पालिकेच्या अ विभाग कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी त्याला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
दरम्यान, उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही हा व्हिडिओ शेअर करत नाराजी व्यक्त केली.

आनंद्र महिद्रा यांनी म्हटले, जर नागरिकांनी वागणूक बदलली नाही
तर फिझिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कितीही विकास झाला तरी जगण्यात विकास होऊ शकणार नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जादा नफा देण्याच्या बहाण्याने सव्वातीन लाखाची फसवणूक, कोरेगाव पार्कमधील प्रकार

खंडणी मागणाऱ्या मोहसिन उर्फ मोबा शेख व त्याच्या साथीदारावर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 88 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA