Maharashtra Police Recruitment | राज्यात डिसेंबर 2021 पर्यंत 5200 पोलिसांची भरती, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांची घोषणा (व्हिडिओ)

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती (Maharashtra Police Recruitment) केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 31 डिसेंबर 2021 पूर्वी 5200 पदांची भरती (Maharashtra Police Recruitment) करण्यात येणार असून त्यानंतर 7 हजार पदे भरली जाणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांनी आज केली. दिलीप वळसे पाटील सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

डिसेंबरपूर्वी 5200 जागेवर भरती
पत्रकारांशी संवाद साधताना दिलीप वळसे-पाटील म्हणाले, 31 डिसेंबर 2021 पूर्वी महाराष्ट्र पोलीस दलातील 5200 जगांवर भरती केली जाईल. तर उर्वरित 7 हजार पदांची भरती नंतर केली जाईल. औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी कायदा सुव्यवस्थेची (law and order) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश दिले.

पोलीस कर्मचारी उपनिरीक्षक म्हणून निवृत्त व्हावा
दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले,
पोलीस सेवेत कर्मचारी दाखल झाल्यानंतर संबंधित कर्मचारी किमान पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त व्हावा,
त्यादृष्टीने योजना बनवण्यात येत आहे.
जिल्हा पोलीस दल अधिक सक्षम बनवण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतुन निधीची मागणी करा,
असेही त्यांनी सांगितले. तसेच कोरोना काळात पोलीस दलाने कौतुकास्पद कामगिरी केल्याचे गृहमंत्री म्हणाले.

यावेळी पोलीस महासंचालक संजय पांडे (Director General of Police Sanjay Pandey), विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.एम प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील तसेच बीड, उस्मानाबाद आणि जालना जिल्हा पोलीस अधीक्षक उपस्थीत होते.
बैठकीच्या सुरुवातीला सादरीकरणाद्वारे गृहमंत्र्यांना परीक्षेत्रातील सविस्तर माहिती देण्यात आली.

Web Titel :- Maharashtra Police Recruitment | Home Minister Dilip Walse-Patla announces recruitment of 5200 police personnel in the state by December 2021 (Video)

हे देखील वाचा

Devendra Fadnavis । नाना पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेनं शिवसेना-राष्ट्रवादीला कापरं भरलं, अन्…

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा