Maharashtra Police Transfer | पुण्यातील पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, मितेश घट्टे, स्वप्ना गोरे यांची बदली; पुणे ग्रामीणचे विवेक पाटील पुणे शहरात

पुणे : Maharashtra Police Transfer | गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस उपायुक्त, अधीक्षकांच्या रखडलेल्या बदल्यांना गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात पुणे शहरातील पंकज देशमुख, मितेश घट्टे, स्वप्ना गोरे यांची बदली झाली आहे. तर, पुणे ग्रामीण पोलीस दलातील अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील हे पुणे शहर पोलीस दलात उपायुक्त म्हणून बदलून (Maharashtra Police Transfer) आले आहेत.

Shivajirao Bhosale Bank | शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फरार कर्ज वसुली अधिकाऱ्याला अटक

पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातील विविध आस्थापनांमधील पोलीस उपायुक्तांचे नाव, सध्याचे पद आणि बदलीचे ठिकाण

पंकज देशमुख ( पुणे शहर ते पोलिस अधीक्षक, आर्थिक गुन्हे, सीआयडी, पुणे), मितेश घट्टे ( पुणे शहर ते अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), स्वप्ना गोरे (पुणे शहर ते प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर), कविता नेरकर (अपर पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे ते अपर पोलीस अधीक्षक अंबेजोगाई), संदीप आटोले ( नानवीज दौंड ते पोलीस उपायुक्त मुंबई शहर), तानाजी चिखले (समादेशक, दौंड ते पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, रायगड), गणेश शिंदे (पोलीस उपायुक्त बंदरे परिमंडळ मुंबई ते अपर पोलीस अधीक्षक लोहमार्ग, पुणे). डॉ. काकासाहेब डोळे (प्राचार्य, लातूर ते पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड).

रोहिदास पवार (प्राचार्य, नानवीज, दौंड ते पुणे शहर), विवेक पाटील (अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण ते पुणे शहर), कल्पना बारवकर ( नांदेड ते प्राचार्य, राज्य राखीव पोलीस बल, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड, पुणे), नवनित कुमार काँवत ( पुणे ग्रामीण ते अप्पर अधीक्षक, उस्मानाबाद), नीवा जैन (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट १ पुणे ते पोलिस अधीक्षक, उस्मानाबाद), एस.व्ही. पाठक (समादेशक, दौंड ते पोलिस उपायुक्त मुंबई शहर), शशीकुमार मिना ( मुंबई शहर ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट १), वसंत परदेशी ( वाशिम ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट ७ , दौंड), विनीता साहु ( नागपुर शहर ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट ५, दौंड), एस.जी. दिवाण (पोलिस अधीक्षक, सीआयडी, पुणे ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट १६ कोल्हापूर), दिगंबर प्रधान (पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा, ठाणे ते दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे), तुषार दोषी (प्राचार्य,  मरोळ ते पोलिस अधीक्षक, एटीएस, पुणे).

हे देखील वाचा

Manohar Mama Bhosale | मनोहर मामा भोसले विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 183 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Maharashtra Police Transfer | Transfer of Pune Deputy Commissioner of Police Pankaj Deshmukh, Mitesh Ghatte, Swapna Gore; Vivek Patil of Pune Grameen in Pune city

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update